Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरचे राजकारण : भोर विधानसभेची जागा शिवसेना (उबाठा) ला सोडल्यास निश्चित भगवा फडकवु – ज्ञानेश्वर शिंदे

भोर विधानसभेत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता? 

by Team Rajgad Publication
September 15, 2024
भोरचे राजकारण : भोर विधानसभेची जागा शिवसेना (उबाठा) ला सोडल्यास निश्चित भगवा फडकवु – ज्ञानेश्वर शिंदे

नसरापूर : वेळु-भोंगवली व नसरापूर-भोलावडे जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसैनिकांची सभासद नोंदणी आढावा बैठक वरवे (ता. भोर) येथे रविवार (दि. १५ सप्टेंबर) पार पडली.आगामी निवडणुकीत भोर विधानसभेची जागा शिवसेनेला सोडल्यास निश्चित भगवा फडकवु असा विश्वास तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, तालुका संघटक दशरथ गोळे, तालुका संघटिका निशा सपकाळ, तालुका समन्वयक भरत साळुंखे, तालुका युवासेना प्रमुख अनिकेत शिंदे, तालुका उपसंघटिका राणी मांढरे, रुपाली पडवळ, विभाग प्रमुख विजय सावंत, एकनाथ तावरे, माजी तालुका प्रमुख पोपट जगताप, बाळासाहेब सुतार, निलेश भांडे, जनार्दन हारपुडे तसेच आदी पदाधिकारी व जुने शिवसैनिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत भोर विधानसभेत कोणत्या पक्षाला जागा सुटेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसापूर्वी खा.सुप्रिया सुळे यांच्याकडून भोर विधानसभेची संग्राम थोपटे यांच्या नावासाठी घोषणा करण्यात आली होती. यानंतर भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील शिवसैनिक नाराज झाले होते व यावेळी त्यांनी आम्हाला पण गृहीत धरू नये आमचं पण ठरलं आहे हे देखील स्पष्ट केले होते त्यानंतर याच भोर विधानसभेवरती अनेक किस्से समोर येत आहेत.

त्यानुसार आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी सभासद नोंदणी आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी बोलताना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भोर विधानसभा मतदार संघात पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसैनिकांने काम करत मोठे मताधिक्य दिले असून येत्या विधानसभा निवडणुकीत सुध्दा भोर मतदार संघातील शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या मागे ठाम राहतील. तसेच भोर विधानसभेची जागा शिवसेनेला सोडल्यास निश्चित भगवा फडकवु.

तसेच शिंदे पुढे बोलताना म्हणाले, जागा जर अन्य पक्षाला सोडल्यास मातोश्रीच्या आदेशाने पालन करु. आघाडीमधील एकसंघता कायम आहे, तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकात तिनही पक्षाने महाविकास आघाडीचा धर्म पाळणे आवश्यक आहे तो पाळला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी तालुका संघटक दशरथ गोळे यांनी सुत्रसंचालन केले तर माजी तालुका प्रमुख पोपट जगताप यांनी आभार मानले.

महाविकास आघाडीचे काम शेतकऱ्यांच्या वारंगुळ्यासारखे : माऊली शिंदे

शेतकरी शेती करत असताना दुसऱ्याच्या शेतात जाऊन एकमेकांना मदत करीत असतात याला शेतकरी वारंगुळा म्हणतात असेच काम महविकास आघाडीचे आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक इच्छुक 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पुणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी देखील राजगड न्यू शी बोलताना काही दिवसापूर्वी आपण देखील इच्छुक आहोत तसेच सुप्रिया सुळे यांनी केलेले वक्तव्य चुकीचेच आहे त्यानुसार आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे बोर विधानसभेची जागा मागणी करणार आहोत व लढवण्यासाठी आम्ही देखील खंबीर आहोत हे देखील सांगितले होते त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी देखील भोर विधानसभेवर भगवा फडकू हे देखील व्यक्त करत विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhormahavikasaghadishivsena
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
धनकवडीतील तरुणाची आत्महत्या: वरंधा घाटात मृतदेह सापडला

धनकवडीतील तरुणाची आत्महत्या: वरंधा घाटात मृतदेह सापडला

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group