भोर: येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने अनेक राजकीय घडामोडींना वेग आला असून, त्या दृष्टीने राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु असल्याचे चित्र राज्यभर पाहिला मिळत आहे. यातच भोर विधानसभा मतदारसंघावर तीन टर्म निवडून आलेल्या संग्राम थोपटे (sangram thopate) यांना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या वतीने चौथ्यांदा उमेदवारी देण्याचे जवळपास फायनल झाल्याचे बोलले जात आहे. अशातच थोपटे यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांगावात पोहचून संघटन वाढवण्याचे काम ते करीत असून, चिखलगाव येथील अर्जुन दिघे यांची भोर तालुका काँग्रेससच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच यावेळी त्यांच्या सोबत अनेकांनी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.
आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन व त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा धडाका पाहून भोर तालुक्यातील चिखलगाव येथील अर्जुन दिघे यांची भोर तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच यावेळी रोहिदास धोंडे, बाळासाहेब धोंडे, प्रदीप धोंडे, शांताराम धोंडे, प्रमोद धोंडे, रामदास धोंडे, विजय धोंडे, आप्पाजी धोंडे, आनंदा निगडेकर यांनी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन करून पक्षात स्वागत केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.
यावेळी भोर पंचायत समितीचे मा. सभापती बाळासाहेब थोपटे यांच्यासह पांडुरंग धोंडे, राजाराम धोंडे, शंकरनाना धोंडे, रघुनाथआप्पा धोंडे, राजेंद्र शेटे, प्रमोद थोपटे, संतोष केळकर, शिवाजी सासवडे, शिवाजी सणस, पर्वती धोंडे आदी उपस्थित होते.