Monday, November 9, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरमध्ये एसटी बस लोकार्पण सोहळ्यावेळी भाजप व राष्ट्रवादीत श्रेयवादाचा कलगीतुरा

by SBPRNL
June 7, 2025
भोरमध्ये एसटी बस लोकार्पण सोहळ्यावेळी भाजप व राष्ट्रवादीत श्रेयवादाचा कलगीतुरा

भोर (जि. पुणे) | प्रतिनिधी : भोर एस.टी. आगाराला नव्याने प्राप्त झालेल्या पाच एस.टी. बसगाड्यांच्या लोकार्पण सोहळ्याचे शुक्रवारी (दि. ६ जून) राजकीय मंच बनलेले दिसून आले. एकाच विषयावर दोन वेळा दोन पक्षांनी वेगवेगळे कार्यक्रम घेतल्याने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच श्रेयवाद उफाळून आला. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले असून, आगामी राजकीय समीकरणांची झलकही यावेळी दिसून आली.

या नव्या पाच बसगाड्यांचे अधिकृत लोकार्पण सकाळी ८ वाजता माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह थोपटे यांनी ‘या बसेस मिळविण्यासाठी आमच्या प्रयत्नांना यश आले,’ असा दावा करत लोकार्पण सोहळा पार पाडला. त्यांनी या गाड्या भोरकर जनतेसाठी समर्पित करत ‘भाजप सरकारच्या प्रयत्नांनी हा लाभ मिळाला,’ असे सांगितले.

You might also like

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

मात्र काही तासांतच, सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी हाच लोकार्पण सोहळा नव्याने आयोजून राजकीय वातावरण तापवले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी जि.प. सदस्य चंद्रकांत बाठे, माजी नगरसेवक केदार देशपांडे, तसेच प्रवीण जगदाळे (सरपंच, भोलावडे) आदींसह मोठा कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

या कार्यक्रमात आमदार मांडेकर यांनी एसटी आगार ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत कर्मचाऱ्यांसह बसने प्रवासही केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “या पाच बसेस मंजुरीसाठी मी आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने सातत्याने पाठपुरावा केला. माजी आमदार संग्राम थोपटे यांचा या मंजुरीशी प्रत्यक्ष काहीही संबंध नाही. ते युती सरकारमध्ये निवडणुकीनंतर सामील झाले. प्रस्ताव जुना असला तरी मंजुरी आणि अंमलबजावणी आमच्याच प्रयत्नातून झाली आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “या आगाराला आणखी पाच नव्या बसगाड्या लवकरच मिळणार आहेत, तर पुणे एसटी आगारासाठी पाच इलेक्ट्रिक बसही मंजूर झाल्या आहेत. भोर शहर आणि तालुक्याच्या वैभवात भर घालण्यासाठी दर्जेदार सेवा देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत भोरचे जुने वैभव पुनःप्राप्त करण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे.”

या सगळ्या घडामोडींमुळे भोरमधील राजकीय वातावरणात उधाण आले असून, दोन प्रमुख पक्षांमध्ये ‘कोणाचा खरा वाटा?’ या मुद्द्यावरून उघड राजकीय संघर्ष समोर आला आहे. लोकप्रतिनिधींनी एकाच सुविधेचे दोनदा उद्घाटन करणे ही बाब जनतेच्या चर्चेचा विषय ठरली असून, एसटी प्रशासनही या वादामुळे कोंडीत सापडल्याचे बोलले जात आहे.

या प्रकरणातून स्पष्ट होते की, आगामी काळात भोरमधील राजकारण अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. लोककल्याणासाठी होणाऱ्या कामांवर राजकीय श्रेय घेण्यासाठी होणारी स्पर्धा कितपत जनहिताची ठरते, हा खरा प्रश्न आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प
पुणे

November 2, 2026
नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!
क्राईम

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!
क्राईम

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन
ताज्या बातम्या

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पंचनामा

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

Next Post
शिवरे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाण्यांचे वाटप

शिवरे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाण्यांचे वाटप

ताज्या बातम्या

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

November 2, 2026
नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

November 1, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group