Tuesday, July 7, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरः तालुक्याची दुर्दशा व आर्थिकदृष्ट्या मागासलेपण आजही कायम, भोरवासियांची रोषाची भावना तीव्र

कित्येक वर्षांपासून परिस्थिती 'जैसे थे'च असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट

by SBPRNL
August 24, 2024
भोरः तालुक्याची दुर्दशा व आर्थिकदृष्ट्या मागासलेपण आजही कायम, भोरवासियांची रोषाची भावना तीव्र

भोरः भाग १

तालुक्यातील गेल्या ३२ वर्षांपासून औद्योगिक वसाहत (MIDC) चा प्रश्न रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. यामुळे रोजगाराच्या अभावी  तालुक्यातील युवा वर्गावर वणवण भटकत राहण्याची वेळ आली आहे. शिरवळ, पुणे, मुंबई या ठिकाणी विस्थापित झालेला युवावर्ग कामाच्या शोधात जात आहे. अशी अवस्था इथल्या तरुणांची झालेली आहे. कित्येक वर्षांपासून कोणताही नवीन प्रकल्प, कारखाना येथे येऊ शकला नाही. भाटघर, निरा देवधर, गुंजवणी आणि वीर या चार धरणांतून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. बळीराजा देशोधडीला लागला तरी अनेक वर्षांपासून शेतीसाठी शास्वत पाणी पुरवठा नाही. उपसासिंचन योजना अपूर्णवस्थेत आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

गेली कित्येक वर्षे भोर तालुक्यांतील युवकांसाठी कोणत्याही प्रकारचे क्रीडा संकुल नाही. क्रिडांगणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत कित्येक वर्षे शिवसृष्टी उभारण्यात आली नाही. या सारखी दुर्दैवाची बाब नाही. कित्येक वर्षे भ्रष्टाचार, हुकुमशाही कारभार असल्याने तालुक्यातील सहकारी संस्था बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सहकारातून एकेकाळी लाखो रुपये दुध उत्पादक, शेतकरी वर्गाच्या हातात यायचे ते बंद झाले आहे. तालुक्यातील कोणत्याही भागात जावा अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्ते पहायला मिळतात. त्यामुळे भोर तालुका पर्यटनासाठी आजही मागासलेल्या अवस्थेत आहे.

कित्येक वर्षे भोर तालुक्यातील ऐतिहासिक मंदिरे आजही अत्यंत असुविधा असणारी व दळणवळणाच्या दृष्टीने अयोग्य रस्ते असल्याने कोणत्याही प्रकारचे विकास आराखडे तयार करण्यात आले नाहीत. म्हणून पर्यटन विकास होत नाही. तालुक्यातील बसस्थानकात राडारोडा, चिखल, अस्वच्छता आदींनी ग्रासलेले आहे.( या कामी मोठ्या प्रमाणार निधी मंजूर झाला असून कामाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे हा प्रश्न सुटेल असे वाटते.)  भोर डेपोला प्रवासी वर्गाच्यासाठी नवीन चांगल्या प्रकारच्या गाड्या आलेल्या नाहीत.
तालुक्यात नियोजनशुन्य, दुरदृष्टी नसल्याने इच्छा शक्ती नसल्याने व जनतेला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारे पुढारी जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतः ची तुंबडी भरून काढण्यासाठी व्यस्त असल्याने आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या पिचलेल्या जनतेच्या हितासाठी व जिवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे भोर तालुक्यातील बळीराजा, युवा, महिलावर्ग आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या व पिचलेल्या अवस्थेमध्ये आहे. असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

क्रमश….

Tags: Bhorrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
सावधान! पावसाचा जोर वाढतोय, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सावधान! पावसाचा जोर वाढतोय, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ताज्या बातम्या

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

July 2, 2026
शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

July 1, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group