भोर – पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठ यांच्याकडून दिला जाणारा “तेजस्वीनी २०२४ ” हा पुरस्कार येथे पुणे महानगरपालिकेत शिक्षण आयुक्त म्हणून कार्यरत व यापुर्वी भोर तालुक्यातील वाठार हि मा व खानापुर जिल्हा परिषदेच्या शिक्षीका म्हणून कार्य केलेल्या भोंगवली (ता .भोर) येथील रहिवासी आशा राऊत (शेटे) यांना मिळाला. त्यांना महिला सशक्तीकरणासाठी केलेल्या भरीव, अनमोल कामगिरीबद्दल पुरस्कार दिला आहे असे ज्ञानपीठ संस्थेकडून सांगण्यात आले.
यावेळी चिंतामणी ज्ञानपीठचे अध्यक्ष अप्पा रेणुसे, सचिव ऐश्वर्या रेणूसे , कार्याध्यक्ष आमदार शंकर जगताप, पंचायत समिती भोर येथे अधिकारी म्हणून कार्यरत असणारे आशा राऊत यांचे पती सुनिल शेटे , चिंतामणी ज्ञानपीठ संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.