गोवा आणि कोची येथे देशातुन आलेल्या १३२ जणांमधुन निवड
भोर – जिद्द व चिकाटी,मेहनतीच्या जोरावर अत्यंत कठीण प्रशिक्षण पुर्ण करुन भोलावडे (ता.भोर) येथील सुपुत्र अविष्कार काळूराम शिंदे याची इंडीयन नेव्ही मध्ये मरीन कमांडो म्हणून निवड झाली. भोर तालुक्यातील पहिला मरीन कमांडो ठरला आहे.
लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणा-या अविष्कारने १ ते ४ थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण बसरापुर ( ता.भोर) जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळेत पुर्ण केले. तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण भोर येथील जिजामाता विद्यालयात पुर्ण केले १२ वी सायन्स झाल्यावर अविष्कार शिंदेने मरीन कमांडो होण्याचे स्वप्न अथक प्रयत्नांनी पूर्ण केले आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन गरुड भरारी घेणाऱ्या अविष्कार शिंदेने उराशी बाळलेल्या स्वप्नाची पूर्ती करून जिद्दीच्या जोरावर यश मिळविता येते हे दाखवून दिले आहे. वडील काळूराम शिंदे माध्यमिक शिक्षक तसेच आई माया शिंदे या पंचायत समिती मध्ये शिक्षण विभागात कार्यरत आहेत. अविष्कारने परीक्षा पहिल्या प्रयत्नात यश संपादन केले. बारावी सायन्सनंतर मरीन कमांडोची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात २०२१ मध्ये पास होऊन गोवा आणी कोची येथे प्रशिक्षण पुर्ण केले आहे.
देशातुन १३२ जण प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. माञ अत्यंत कठीण असलेले हे प्रशिक्षण ५८ जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले.समुद्रात जहाजावर जावे लागते,आतंकवादी हल्ला किंवा आपतकालीन परिस्थितीत आल्यावर सदैव तत्पर रहावे लागते.आपल्या जिद्दीला अभ्यासाची जोड देत संपूर्ण देशात अवघड समजल्या जाणाऱ्या इंडीयन नेव्हातील मरीन कमांडोची परीक्षा उत्तीर्ण होण्याची किमया केली आहे.परिसरातील नागरिक व मित्र मंडळींकडून त्याचे कौतुक होत आहे.
” लहानपणापासुन इंडियन नेव्हीत जाण्याचे स्वप्न होते अधिक परिश्रम घेऊन परीक्षा पासच व्हायचे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवले.आई माया शिंदे आणि वडील काळूराम शिंदे यांनी प्रोत्साहन देत आत्मविश्वास निर्माण केल्याने कोणतीही खाजगी शिकवणी न लावता सेल्फ स्टडीवर भर देत नियमित अभ्यास करून यश संपादन केले तरुणांनी इंडीयन नेव्हीत आले पहिजे.” अविष्कार शिंदे ( इंडियन नेव्ही मरीन कमांडो रा. भोलावडे(ता.भोर जि.पुणे)
“माझ्या मुलांने उच्चशिक्षित व्हावे व चांगल्या नोकरीस लागावे हे आमचे स्वप्न आविष्कार इंडीयन नेव्हीत पहिल्याच प्रयत्नात अत्यंत कठीण प्रशिक्षण परीक्षा पास होऊन पूर्ण करून दाखविले.”
माया शिंदे व काळूराम शिंदे (आई वडील)भोलावडे(ता.भोर)