भोरः पुण्यश्लोक अहिल्यादेवी मित्र मंडळ आयोजित भव्य होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी सहभाग घेत उस्फुर्त प्रतिसाद दिला. गेल्या ३८ वर्षांपासून हे मंडळ भोरमधील वेताळपेठ येथे असून, गणेशोत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. या वर्षी देखील मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी सुद्धा महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करुन प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू आणि विविध इलेक्ट्रॉनिक, फर्निचर आणि घरूपयोगी बक्षिसे देण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अभिषेक कांबळे, उपाध्यक्ष सागर गायकवाड आणि मयूर घोणे, शिवम पलंगे, प्रथमेश कांबळे, आदित्य घोणे, सौरव घोणे, योगेश घोलप, प्रथमेश घोणे, सोमेश घोणे, ऋषिकेश निकुडे यांनी नियोजन केले आणि पुढच्या वर्षी या मंडळाचे ४० वे वर्ष असल्याने मोठ्या आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांनी आयोजन करण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.