Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

by Aakanksha Yadav
May 12, 2025

भोर –  तालुक्यातील येवली गावात जागेच्या वादातून दोन गटात शुक्रवारी (दि. ९ मे) तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल होत शनिवारी रात्री उशिरा तब्बल १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या गटातील फिर्यादी सूर्यकांत सोपान खंडाळे (वय ५८ वर्ष, रा. येवली, ता. भोर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी हे शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरासमोर बसले असताना, आरोपींनी जमाव जमवून येथे बांधकाम करणार असे म्हणून हाताने, लाथाबुक्याने, खोऱ्याने व काठीने फिर्यादी यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी किरण विष्णू खंडाळे, विष्णू दिनकर खंडाळे, नवनाथ सिताराम खंडाळे, सिताराम दिनकर खंडाळे, आदिनाथ सिताराम खंडाळे, रूपाली नवनाथ खंडाळे, केतकी आदिनाथ खंडाळे, श्रीनाथ सिताराम खंडाळे (सर्व रा.येवली, ता. भोर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

दुसऱ्या गटातील फिर्यादी केतकी आदिनाथ खंडाळे (वय ३८ वर्ष, रा.येवली, ता. भोर) यांनी तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी या शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरामध्ये स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी अचानक त्यांना घराबाहेर भांडणे झाल्याचा आवाज आला. तेव्हा त्यांनी पाहिले की, त्यांचे चुलत दिर किरण विष्णु खंडाळे हे खाली पडले होते. त्यावेळी त्यांना विरोधी गटातील लोक हाताने, लाथाबुक्क्यांनी, काठीने व लोखंडी गजाने मारहाण करत होते. यावेळी फिर्यादी यांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी गळ्यातील मंगळसूत्र ओढुन नेऊन अश्लील वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी चंद्रकांत सोपान खंडाळे, सुर्यकांत सोपान खंडाळे, भिमाजी एकनाथ खंडाळे, रामदास दशरथ खंडाळे, सुनिता चंद्रकांत खंडाळे, संगिता रामदास खंडाळे, सारीका भिमाजी खंडाळे, राजेंद्र विठ्ठल खंडाळे (सर्व रा. येवली, ता. भोर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. जे. खोत करत आहेत. दोन गटात झालेल्या या हाणामारीमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनतर भोर पोलिसांनी तातडीने दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor News - भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group