गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बाजारपेठेतील मार्ग मोकळा रहावा यासाठी पोलिस प्रशासन व नगर प्रशासनाचा निर्णय
भोर शहरात आज मंगळवार (दि१७)अनंत चतुर्दशीचे गणेश विसर्जन मोठ्या प्रमाणात असल्याने आजच्या दिवशीचा होणारा मंगळवारचा आठवडे बाजार सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक असल्याने या दिवशीचा भरविण्यात येणारा आठवडे बाजार पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त पाहणीनुसार नगरपालिका शाळा क्रमांक दोन म्हणजेच भोर पोलीस स्टेशन समोरील शाळा येथील मैदानावर भरवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच उर्वरित बाजार नगरपालिका भोर न्यायालय वेताळ पेठ रस्त्यावर भरवण्यात येणार आहे, जेणेकरून या विसर्जन रस्त्यावर कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होणार नाही, गणेश भक्तांची नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही दक्षता प्रशासनाकडून घेण्यात आली आहे .
भोर शहरात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाचा मार्ग नेहमीच्या मुख्य रस्त्यावरून जात असल्याने या मुख्य रस्त्यावर आठवडे बाजार बसण्यास सक्त मनाई प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. नागरिकांनी, गणेश भक्तांनी शांततेत व कायदा सुव्यवस्थेचे पालन करत मिरवणूका काढाव्यात असे जाहीर आवाहन पोलिस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांनी नागरिकांना केले आहे .