विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी केली मनोगते व्यक्त, हास्य, मनोरंजन, संगीत, गप्पा गोष्टीत घालवला दिवस
भोर – येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित छत्रपती शिवाजी विद्यालयातील सन १९९२-९३ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३३ वर्षांनी एकत्र येत आपल्या शालेय जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या शिक्षकांसमवेत स्नेहमेळावा साजरा करत बालपणीचा आनंद लुटला . स्नेहमेळाव्यात प्रथम सरस्वती पूजन करून हजेरी घेतल्यानंतर माजी विद्यार्थ्यांंनी आपण कार्यरत असलेल्या क्षेत्रातील आपली नव्याने ओळख करून देत शालेय जीवनातील अनुभव कथन केले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत शालेय जीवनात अनुभवलेले क्षण, शिक्षकांची शिकवण, चुकीच्या वेळी झालेली शिक्षा, मित्र मैत्रिणी यांच्यातील गप्पा गोष्टी तसेच आता करीत असलेले काम, नोकरी,व्यवसाय या विषयी आणि कौटुंबिक माहिती या बाबतीत हितगुज व चर्चा केली. परिचया दरम्यान काहींना आनंदाश्रुंन अनावर झाले.मुंबई, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यातून विद्यार्थी एकत्र आले होते. प्राचार्या श्रीमती शिकिलगर यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
राजकारण, वकिल, शिक्षिक, इंजिनिअरिंग क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, विविध खाजगी कंपन्यामध्ये व उद्योग व्यवसायिक अशा विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थी कार्यरत आहेत. या प्रसंगी प्रयोग शाळा बांधकाम करुन देण्याची मागणी शाळेने केली या बॅचचे विद्यार्थी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे कामाच्या व्यस्ततेमुळे हजर राहू शकले नाही परंतु विद्यार्थ्यांना फोनवरून शुभेच्छा देत शाळेकरीता तीन प्रयोग शाळा बांधून देण्यात येतील असे आश्वासन दिले. या प्रसंगी संदीप शेटे, संतोष शेटे, विजय दामगुडे, राजेंद्र थोपटे, संजय आलगुडे, समिर शेख, शशिकांत डबडे, तुषार शिंदे, माऊली दबडे, श्रीहरी मञे, रविंद्र भगत, नितिन खोपडे, सुनिल शिवतरे, सचिन बांदल , सचिन तनपुरे, भानुदास बरदाडे, सुभाष चिकणे, शारदा जेधे , कल्पना थोरवे, कल्पना वीर, राणी कुडपणे, आरदा बांदल, शारदा वीर, भारती किंद्रे, सविता दुधाणे, सारिका राजिवडे, ज्योती कोंढाळकर, स्वाती बदक, वैशाली वीर, गुलनाज मुलाणी, रत्नप्रभा करवंदे असे माजी विद्यार्थी उपस्थित होते. संदीप शेटे व विजय दामगुडे यांनी मनोगत व्यक्त केले.