सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल दिव्यांग प्रहार संघटनेचे भोरचे अध्यक्ष बापू कुडले यांना विभागातुन तृतीय क्रमांक
प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संस्था यांच्या वतीने संताजी धनाजी पुरस्कार २०२५ राज्यस्तरीय विभागीय पुरस्कार मेळावा सातारा कराड येथे माजी मंत्री बच्चु कडू यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यात पुणे, सातारा, सांगली ,कोल्हापूर या जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विभागून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक भोर तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले सन्मानपत्र सन्मान चिन्ह माजी राज्य मंत्री बच्चु कडू यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. गेल्या आठ वर्षातील निरंतर सामाजिक सेवेसाठी संताजी धनाजी कार्यकर्ता पुरस्कार २०२५ व संतगाडगे बाबा सामाजिक सेवा पुरस्कार २०२५ संपूर्ण विभागातून तृतीय क्रमांकासाठी बापू कुडले यांना गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमा प्रसंगी प्रहार संघटनेच्या महिला अध्यक्षा मनीषा गायकवाड, संपर्क प्रमुख भानुदास दुधाणे ,कार्याध्यक्ष राणी शिंदे, सदस्या सुनिता कंक, सुरेश कोंडे, शंकर खोंडगे, अनिल दळवी, गोळेवाडी माजी सरपंच तुकाराम गोळे, नांदगावचे माजी उपसरपंच धोंडीबा कुडले विद्या कुडले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच करंदी खे बा पोलीस पाटील विजय कव्हे , शिवसेनेचे आदित्य बोरगे, प्रहार संघटनेचे सचिव शांताराम खाटपे यांचे विशेष सहकार्य लाभले
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष बापू कुडले म्हणाले की ,हा गौरव माझा वैयक्तिक नसून सामूहिक आहे ज्याचे भागीदार माझे कुटुंब संघटनेचे सर्व सहकारी , सर्व दिव्यांग बंधु भगिनी हे आहेत.