कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – कंक
पुणे महानगरपालिका मान्यता प्राप्त कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश श्रीपती कंक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. म्हसरखुर्द येथील जननीदेवी मंदीरात अंकुश कंक यांची पुणे महानगरपालिका मान्यता प्राप्त कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबददल सत्कार समारंभाचे आयोजन जय हनुमान मिञ मंडळ व ग्रामस्तांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी वनपरिक्षेञ अधिकारी संतोष कंक, उद्योजक अमित शिवतरे, सरपंच संतोष गोळे, उपसरपंच शंकर पारठे , अंकुश कंक, जय हनुमान मिञ मंडळ अध्यक्ष एकनाथ खरोसे, आनंदा कंक, लक्ष्मण कंक , सुर्यकांत किंद्रे ,विलास मादगुडे, अर्जृन खोपडे, तुकाराम राजिवडे, धोंडीबा पारठे, संतोष सातपुते आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वनपरिक्षेञ अधिकारी संतोष कंक म्हणाले की ग्रामीण भागात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले अंकुश कंक यांना प्रथमच उपाध्यक्ष पद मिळाले असुन महानगरपलिकेतील कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कंक यांनी विशेष प्रयत्न करणार आहेत.कयावेळी अमित शिवतरे, शंकर पारठे यांनी मनोगते व्यक्त केलीत व उपस्थितांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.