भोरला दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये शनिवार (दि १०) रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ३९४ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ९ लाख ९४ हजार ११४ रुपयांची वसुली झाली. तसेच १११५ दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी १७३ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १ लाख ९४ हजार ७५६ इतक्या रक्कमेची वसुली झाली अशी सर्व एकूण १४०९ प्रकरणांपैकी ३३ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन एकूण ११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली झाली.
या राष्ट्रीय लोकआदालती मध्ये पॅनल क्रमांक-१ चे पॅनल जज म्हणून न्यायाधीश नेहा नागरगोजे ,ॲड सुवर्णा बदक व पॅनल क्रमांक-२ चे पॅनल जज म्हणून न्यायाधीश मीना जाधव, शिवाजी पांगारे यांनी पॅनल सदस्य म्हणून कामकाज पाहिले. सदर लोकअदालतीसाठी भोर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड संतोष बाठे, इतर सर्व पदाधिकारी व वकील सदस्य उपस्थित होते. तसेच दिवाणी न्यायालयाचे सहायक अधिक्षक सुमेध गुजर व न्यायालयीन कर्मचारी वर्ग, पोलिस कर्मचारी, महावितरण, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ महाराष्ट्र, वंदे मातरम पतसंस्था व पंचायत समितीचे अधिकारी व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.