मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार संघ भोरकडून अभिवादन
भोर – शहरातील गरीब गरजूंना पत्रकार संघ भोर यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत एक हात मदतीचा पुढे करत सध्या सुरू असणाऱ्या थंडीपासून बचावासाठी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून हिवाळी ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
पत्रकार संघाच्या कार्यालयात दर्पणकार मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस सर्व पत्रकार बांधवांकडून पुष्पा अर्पण करून पूजन करत अभिवादन करण्यात आले.
समाजाच्या न्याय हक्कांसाठी कायमच लढा देणाऱ्या तसेच समाजातील चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकार बांधवांनी समाज हिताचा उपक्रम राबवीत शहरातील अनाथ गरीब गरजूंना मदतीचा हात म्हणून १० ब्लॅंकेट वाटप केले. पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या मार्गदर्शनाखाली कायमच उपक्रमशील असलेला पत्रकार संघ भोर यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे. पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचे सामाजिक कार्यकर्ते राजीव केळकर, तनिष्का व्यासपीठाच्या अध्यक्षा सीमा तनपुरे, दत्ता मोरे, समीर घोडेकर, माजी सरपंच चंद्रकांत नांगरे, लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडून तसेच तालुक्यातील अनेक व्यक्तींकडून सन्मान केला व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात. तसेच समाजातील प्रत्येक घटकांकडून, तळागळातील नागरिकांकडून शुभेच्छा दिल्या गेल्या. यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष म्हस्के, संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुसळे, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सोशल मीडिया अध्यक्ष कुंदन झांजले, उपाध्यक्ष दिपक पारठे, खजिनदार दत्तात्रय बांदल, सहखजिनदार विक्रम शिंदे, सहसचिव रुपेश जाधव, किरण अंबिके, महेश उभे,मंगेश पवार आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.