भोर तालुक्यातील टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी भोर तालुक्यात एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प भोर, पंचायत समिती भोर यांच्या वतीने भोर तालुक्यातील कातकरी वस्तींवर अंगणवाडी सुरू केल्या आहेत या अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना आपल्या ध्रुव प्रतिष्ठान मार्फत भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर, सहाय्यक गटविकास अधिकारी उदय जाधव विस्तार अधिकारी सुनील शेटे यांनी,पर्यवेक्षिका अस्मिता सस्ते, प्रतिभा बरबटे, संगीता जाधववर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सन २०२४-२५ शासन मार्फत पीएम जनमन अंतर्गत कातकरी वस्तीसाठी चार अंगणवाडी केंद्र मंजूर करण्यात आली आहेत यामध्ये नसरापूर कातकरी वस्ती विद्यार्थी संख्या १६,वडगाव डाळ कातकरी वस्ती विद्यार्थी संख्या १४, कासुर्डी गुमा कातकरी वस्ती विद्यार्थी संख्या १६, शिरवली तर्फे भोर कातकरी वस्ती विद्यार्थी संख्या १५ या चारही ठिकाणी अंगणवाडी सेविका मदतनीस यांची शासन नियमानुसार नव्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे चारही ठिकाणी अंगणवाडी इमारत बांधकाम रक्कम बारा लाख मंजूर झाले असून शिरवली तर्फे भोर व कासुर्डी-गुमा येथील इमारती किरकोळ काम वगळता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वीच्या कातकरी वस्तीवरील अंगणवाडीमध्ये तांबड कातकरी वस्ती विद्यार्थी संख्या १०, नाझरे झुलता पूल कातकरी वस्ती विद्यार्थी संख्या १८, सिद्धेश्वर वस्ती वाघजवाडी कातकरी वस्ती विद्यार्थी संख्या १४ या ठिकाणी इमारती उपलब्ध आहेत वरील प्रकल्पात सात कातकरी वस्तीवरील अंगणवाडी केंद्रातील १०३ बालकांना (तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगट) ध्रुव प्रतिष्ठान यांच्या वतीने दप्तर,पाटी, पुस्तक, पेन्सिल, पाणी बॉटल, खाऊ इत्यादींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी गटविकास अधिकारी किरण कुमार धनवाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी उदय जाधव, विस्तार अधिकारी सुनील शेटे ,पर्यवेक्षिका अस्मिता सस्ते, प्रतिभा बरबटे, संगीता जाधववर विद्यार्थी उपस्थित होते