भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील जयतपाड – नांदघुर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन शनिवार ( दि१५) रोजी भोर ,राजगड (वेल्हा ), मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कामांमध्ये वाढेश्वर मंदिर ते विचारेवाडी रस्ता २० लक्ष, जयतपाड नांदघुर ग्रामपंचायत कार्यालय २० लक्ष, प्रजीमा ४४ ते जयतपाड रांजणवाडी येथील नवीन पूल बांधणे १ कोटी ५० लक्ष अशा कामांचे उद्घाटन भूमिपूजन यावेळी करण्यात आले. हि सर्व विकासकामे महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद पुणे अंतर्गत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या विशेष प्रयत्नांतुन मंजूर झाली असून या विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचा मान मला मिळाला, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांमुळे स्थानिक नागरिकांना उत्तम सुविधा आणि विकासाचे नवे क्षितिज उपलब्ध होईल असे यावेळी आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले
यावेळी जिल्हा परिषद पुणे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संतोष घोरपडे, पंचायत समिती माजी उपसभापती विक्रम खुटवड, सरपंच सुजाता दिघे, भोलावडेचे सरपंच प्रविण जगदाळे, बसरापुर सरपंच निलम झांजले ,पसुरेचे सरपंच पंकज धुमाळ, प्रशांत पडवळ, सुरेश कडू, गोविंद बदक,सर्जेराव बोडके, गावातील ग्रामस्थ तरुण, पंचक्रोशीतील विविध मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील तसेच पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.