भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले
भोर कडुन महागडे जाणा-या महामार्गावर वरंधा घाटात वाघजाई मंदिरजवळ दरड कोसळली असून मोठ्या प्रमाणात रस्ता खचल्याची घटना बुधवारी (दि१९) पहाटे घडली आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
भोरवरून महाडगडे व महाड वरून भोरकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते . मध्यंतरीच्या काळात हा रस्ता प्रशासनाने वाहतूकीसाठी बंद केला होता परंतु नंतर पुन्हा हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सध्या मान्सून सुरू झाला असुन या परिसरात घाट माथ्यामुळे नेहमी रिमझिम पाऊस असतो व दाट धुके असते त्यामुळे या घाटप्रवण क्षेत्रात दरडी कोसळण्याचे प्रमाण जास्त असते. या महामार्गावरून रत्नागिरीकडे जात असताना बाजारवाडीचे माजी सरपंच शामराव गोळे यांनी हे रस्ता खचल्याचे माहिती दिली. या महामार्गावर वरून घाट मार्गे जाताना येताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.