भोर शहरात आगीचे सत्र सुरूच; शहरातील रस्ते अरुंद असल्याने अग्नीशामक बंबाला करावी लागली कसरत
भोर शहरात मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडव्याच्या रात्री साडे नऊच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे न्हावी परीट आळीतील एका घराला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली.
शहरातील न्हावी परीट आळी(ता.भोर) येथील सुभाष तुकाराम घोडके यांच्या घराला रात्री साडे नऊच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.आग लागल्याचे लक्षात आल्यावर त्वरित भोर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.परंतु भोर शहरातील पेठेतील, आळीतील रस्ते छोटे अरूंद असल्याने त्या अग्निशामक बंबास मोठी कसरत करावी लागली. काही वेळात न्हावी परीट आळीतील तरुणांसह , अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली . आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांत भोर शहरात आग लागून नूकसान होण्याच्या चार पाच घटना झाल्या आहेत.त्यामुळे शहरात आगीचे सत्र सुरूच असून अग्नीतांडव सुरू आहे.