भोर– शिरवळ मार्गावरील उत्रौली -वडगाव ता.भोर येथे वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर वडाचे झाड कोसळल्याने दोन तासांपासून शिरवळकडे जाणाऱ्या व भोरकडे येणाऱ्या वाहन चालकांची अडचण झाली असून वाहतूक ठप्प झाली आहे.
शनिवार दि.२० सकाळी आठच्या सुमारास अर्धवट जळालेल्या अवस्थेत जळालेले वडाचे झाड उत्रौली -वडगाव जवळ महत्त्वाच्या शिरवळ -भोर या वाहतुकीच्या रस्त्यावर कोसळले. नशीब बलवत्तर म्हणून या कोसळलेल्या झाडाखाली कोणीही वाहनचालक सापडले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला तात्काळ वाहन चालकांकडून माहिती देण्यात आली असुन झाड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.झाड मोठे असल्याने क्रेनच्या साह्याने हटवावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.