विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी व विकासासाठी आरोग्य विषयक तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
भोर पुणे महामार्गावरील भोलावडे हद्दीत असणाऱ्या विद्या प्रतिष्ठानचे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन शनिवार (दि.१) करण्यात आले होते. या शिबिरात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. यावेळी डॉ चंद्रशेखर राऊत ,डॉ प्रियंका राऊत( महाजन ) यांनी विद्यार्थ्यांना आहाराविषयक माहिती दिली, आहार कसा असावा , आहारात कडधान्ये, पालेभाज्या, फळे यांचा समावेश असावा,याचे शरीराला फायदे मोठे होतात तसेच मुलांच्या पचना संबंधीच्या तक्रारी, जी. बी. एस.व्हायरस, आणि त्यासाठी घ्यावयाच्या काळजी या विषय माहिती देत मार्गदर्शन केले . यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनीही उपस्थित डॉक्टरांशी चर्चात्मक संवाद साधला .डॉक्टरांनीही सोप्या भाषेत पालकांच्या शंकांचे, प्रश्नांचे निरसन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक यशवंत डाळ, शिवभक्त सोमनाथ ढवळे , भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सारंग शेटे , माजी अध्यक्ष विजय जाधव, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष म्हस्के, पत्रकार संघ भोरचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष कुंदन झांजले, स्वप्निल पैलवान,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे, रूपाली जगताप, अस्मिता कापरे, इतर सहकारी शिक्षक,शिक्षीका, कर्मचारी, शिपाई उपस्थित होते. विद्यार्थ्यांना स्वतःचे करिअर घडवण्यासाठी शिक्षण, आवड ,व्यवसाय याबाबत माहिती सारंग शेटे व कुंदन झांजले यांनी दिली.