३०० वर्षांची परंपरा अखंडपणे जपत तीन पिढ्यांच्या साक्षीने राजदरबारात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
भोरचे ग्रामदैवत श्री जानाई देवी व भोर संस्थानचे पंतसचिव राजे घराण्याचे कुलदैवत श्रीराम जन्मोत्सव सोहळा शहरात उत्साहात साजरा करण्यात आला.३०० वर्षांची परंपरा अखंडपणे जपत तीन पिढ्यांच्या साक्षीने राजदरबारात पंतसचिव बंधुंच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा केला.शहराचे ग्रामदैवत श्री जानाई देवीची काठी पालखीची मिरवणूक काठीचे मानकरी भेलके पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. काठी पालखी छबीना मिरवणुकीत उंट, घोडे , बैलगाडी, विद्युत रोषणाईचे बग्गी , बॅन्ड बाजा,डि जे , ढोल ताशा, हलगी अशा अत्याधुनिक तसेच पारंपरिक पद्धतीचे वाद्यांचा वापर करण्यात आला.शिवकालीन साधुंचे शिव तांडव नृत्य यात प्रमुख आकर्षण ठरले. रात्री शहरातील ढोल लेझीम पथकांनी उत्तम ढोल लेझीम खेळ सादर करत देवीच्या काठी पालखीला मानवंदना दिली. श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरातुन श्रीरामाची वाजत गाजत जय श्रीराम गजरात मिरवणूक काढण्यात आली. तसेच बैलगाडा शर्यतीत अनेक भागातुन बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवत बैलगाडा शर्यतीत ३०८ बैलगाडा धावले.
श्री जानाई देवी यात्रा आणि श्री रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यात ४०० हून अधिक मल्लांनी हजेरी लावली होती.यात प्रकाश बनकर या मल्लाने प्रथम क्रमांकाची कुस्ती चितपट केल्याने बनकर कुस्ती आखाड्याचा मानकरी ठरला. बनकर याला बुलेट व रोख रक्कम देऊन सन्मानित केले.
शहराचे ग्रामदैवत श्री जानाई देवी व रामनवमीनिमित्त रविवार दि.६ जंगी कुस्त्यांचा आखाडा जोडण्यात आला होता.आखाड्याचे पूजन माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. आखाड्यात १५० कुस्त्या जोडून लावण्यात आल्या होत्या तर इतर ५० कुस्त्या मल्लांना आखाड्यात फिरवून लावण्यात आल्या. पुणे जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्या पाहण्यासाठी तालुक्यातील हजारो कुस्ती शौकिनांनी कुस्ती आखाड्यास रात्री उशिरापर्यंत हजेरी लावली होती.द्वितीय क्रमांक वेताळ शेडगे (ग्रामस्थांकडून रोख रक्कम) तर तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत गणेश जगताप विजयी झाल्याने स्प्लेंडर गाडी व रोख रक्कम देण्यात आली.यावेळी युवानेते पृथ्वीराज थोपटे, अध्यक्ष सचिन तारू, उपाध्यक्ष आकाश सागळे, खजिनदार योगेश दळवी, पै.किरण कांबळे, गुलाब किवळे, माजी उपनगराध्यक्ष गणेश पवार,गणेश कांबळे, सुरज ओसवाल, अमित सुर्वे, मयूर भेलके , दत्तात्रय बांदल, तेजस घोडके, तुषार भोकरे, पिंटू ढवळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.