आधार कार्ड ,मोबाईल नंबर, बॅंक खाते लिंक व प्रमाणिकरण न केल्यास अनुदान लाभ बंद होणार
संजय गांधी निराधार ,श्रावण बाळ योजना सेवा राज्य निवृत्ती लाभार्थ्यांना आधार प्रमाणिकरण बंधनकारक करण्यात आलेला आहे. त्यानुसार भोर तालुक्यात मार्च २०२५ अखेर शासनाचे पोर्टलवर ४५२६ लाभार्थ्यांची आधार नोंदणी करण्यात आली असून शासनाचे पोर्टलवर आधार नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांचे आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात शासनाकडून मार्च २०२५ अखेर डीबीटीद्वारे थेट अनुदान लाभ जमा करण्यात आलेला आहे. लाभार्थ्यांनी गडबडून न जाता त्यांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याशी संलग्न लिंक आहेत त्या बँकेत संपर्क साधावा आणि अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसील कार्यालय संजय गांधी विभागाकडून करण्यात आले आहे.
तसेच आता सर्वत्र आधार कार्ड प्रमाणीकरण करून बंधनकारक झाले असून इथून पुढे आधार प्रमाणिकरण केलेल्याच लाभार्थ्यांचे बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहे ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खाते एकमेकांशी संलग्न केलेले नाही अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आधार कार्ड, मोबाईल नंबर , बँक खात्या खात्याशी संलग्न करून घ्यावे यासाठी तहसीलदार कार्यालयातील संजयगांधी निराधार योजना विभागाशी संपर्क साधावाअसे आवाहन भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन व नायब तहसीलदार प्रतिभा खाडे यांचे मार्फत करण्यात आले आहे.
राज्य सरकारने जानेवारीपासून या योजनांचे अनुदान आधार, मोबाईल, बॅंक खाते लिंक करून प्रमाणिकरण केलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे ज्यांचे आधार मोबाईल प्रमाणीकरण करत नाही अशा लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही अशी माहिती या विभागाचे अधिकारी कोल्लम यांनी दिली.