भोर – तहसीलदार भोर यांच्या आदेशानुसार व राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटलांसाठी ॲट्रोसिटी कायद्यासंदर्भात अंमलबजावणी व माहिती मार्गदर्शन मेळावा शुक्रवार (दि.२४) वाघजाई मंदिर कार्यालयात पार पडला. यावेळी भोरचे नायब तहसिलदार अरुण कदम , भोर न्यायालयाच्या विधीज्ञ अनिता चव्हाण आणि अक्षर मानव संघटनेचे सदस्य सुजीत चव्हाण यांनी सर्व पोलीस पाटलांना कशा प्रकारे काम करावे व काम करत असताना येणाऱ्या विविध अडचणी याबद्दल मोलाचे कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच ॲट्रोसिटी कायदा काय आहे, कोणाला लागू होतो , ॲट्रॉसिटी म्हणजे अत्यंत क्रूर, हिंसक किंवा धक्कादायक कृत्य. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी भारताच्या संसदेने १९८९ मध्ये ॲट्रॉसिटी कायदा पारित केला होता. या कायद्यानुसार, अनुसूचित जाती आणि जमातींवर अत्याचार केल्यास गुन्हा ठरतो. या कायद्यानुसार, अत्याचार करणाऱ्यांना कमीत कमी सहा महिने सश्रम कारावास होऊ शकतो. या कायद्यानुसार, अत्याचार करणाऱ्यांना दंडही भरावा लागतो. अशी माहिती व मार्गदर्शन या मेळाव्यात पोलीस पाटलांना देण्यात आली. यावेळी भोर तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी व पोलीस पाटील संघटनेच्या कार्यकारिणीतील सदस्य आणि तालुक्यातील सर्व महिला, पुरूष पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.