लोकअदालतीने होत आहे न्यायालयावरील भार कमी,३५८ प्रकरणांपैकी ११३ प्रकरणे तडजोडीने निकाली
भोरला दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये शनिवार(दि. २२) राष्ट्रीय लोकअदालत (लोकन्यायालय ) घेण्यात आले .या झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ३५८ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ११३ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ३६ लाख २३ हजार २९० रुपयांची वसुली झाली. तसेच या लोक अदालती मध्ये २६१४ दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी २३ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन २ लाख ६० हजार ८८१ इतक्या रकमेची वसुली झाली अशी सर्व एकूण २९७२ प्रकरणांपैकी ११३ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन एकूण ३६ लाख २३ हजार २९० रुपयांची वसुली झाली.
या राष्ट्रीय लोक आदालती मध्ये मुख्य पॅनल जज म्हणून नेहा नागरगाेजे, दिवाणी न्यायाधीश पॅनल सदस्य क्र. १- ॲड कल्पना म्हस्के व पॅनल सदस्य क्र. २ ॲड यशवंत शिंदे यांनी पॅनल सदस्य म्हणून कामकाज पाहिले. सदर लोकअदालतीसाठी भोर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड संताेष बाठे, उपाध्यक्ष ॲड शिवाजी पांगारे, सचिव ॲड मनिषा तारु, खजिनदार ॲड जगन्नाथ चिव्हे, लेखापरिक्षक ॲड अनिता वाघमारे व इतर सर्व वकील सदस्य उपस्थित होते. तसेच दिवाणी न्यायालयाचे सहायक अधिक्षक सुमेध गुजर व न्यायालयीन कर्मचारी वर्ग, पोलिस कर्मचारी, महावितरण, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ महाराष्ट्र व पंचायत समितीचे अधिकारी व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.