Tuesday, July 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor- भोर वासियांच्या धरण उशाला पण कोरड घशाला ; दिवसाआड पाणीपुरवठा  भाटघर धरण ९६% भरूनही पाण्याची समस्या कायम तर बारा महिने अठराकाळ वीजेचा लपंडाव सुरू

by कुंदन झांजले
July 31, 2025

नागरिक हैराण ; प्रशासन हतबल,व नियोजन शून्य कारभाराने नागरीक संतप्त

भोर – तालुक्यात सध्या घाटमाथ्यावर होत असलेल्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टीने भाटघर धरणात सद्य स्थितीला ९६ टक्के पाणीसाठा असूनही भोर शहरात मागील काही महिन्यांपासून दिवसाआड आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तसेच शहरात वीजेचा लपंडाव सुरू असुन शहरातील नागरिक मूलभूत सुविधा पाणी आणि वीज याबाबत प्रचंड संतप्त झाले आहेत. नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जून महिन्यात सुरूवातीला भाटघर धरणात केवळ ८ टक्के पाणीसाठा होता. त्यावेळी नगरपालिका प्रशासनाने कमी पाणीसाठ्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. आता धरणात ९६ टक्के पाणी असूनही हीच परिस्थिती कायम आहे. वीज खंडित झाल्यास पंप बंद पडतात, वीजेचे कारण देऊन पाणी येत नाही  काही वेळा दोन-दोन दिवस पाणी मिळत नाही. यामुळे नागरिकांमध्ये विशेष करून महिलां मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

भाटघर धरणाच्या भिंतीखाली असलेल्या विहिरीतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणातून चारीद्वारे विहिरीत पाणी आणले जाते, पण धरणातील पाणीसाठा कमी असल्यास विहिरीत पुरेसे पाणी येत नाही. शिवाय, धरणावरील वीजनिर्मिती केंद्र बंद असल्याने पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ९० एचपी आणि ६० एचपी क्षमतेचे प्रत्येकी दोन पंप आहेत, पण अपुरा पाणीपुरवठा आणि कमी दाब यामुळे नागरिकांना स्वच्छ पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

दरवर्षी जैसे थे ,आहे तीच परिस्थिती कायम.

दरवर्षी मे महिन्यात भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने भोर शहरात पाणीटंचाई निर्माण होते. यावर भोर नगरपालिकेकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते. कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याने ही समस्या कायम आहे. १३ कोटी रुपये खर्चून नवीन नळपाणी पुरवठा योजना राबवली गेली, पण वीजनिर्मिती केंद्र बंद असल्याने विहिरीत पाणी कमी पडते. यामुळे ही योजना अपुरी ठरत आहे तसेच स्थानिक आजी माजी नगरसेवकही प्रशासक असल्यामुळे मौन बाळगून गप्प आहेत.

१८ लाखांचा खर्च, तरीही अपुरा पाणीपुरवठा

भोर नगरपालिका प्रशासन दरवर्षी पाटबंधारे विभागाला लाखो रुपये देते, पण तरीही नियमित पाणीपुरवठा होत नाही. यावर उपाय म्हणून भोर शहर शिवसेना प्रमुख नितीन सोनावले यांनी थेट धरणात वीजपंप टाकून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. यामुळे पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी सुटेल, असा त्यांनी दावा केला आहे.

बारा महिने अठराकाळ वीजेचा लपंडाव सुरूच

भोर तालुक्यासह शहरात वीजेचा लपंडाव सुरू असुन लाईट जाणे  ही नित्याचीच बाब झाली आहे.तालुक्यात दोन दोन‌ धरणे नुसती म्हणायला‌ असुन‌ वीजेबाबत लोकांच्या अनेक समस्या जाणवू लागल्या आहेत.दररोज दुरुस्तीच्या नावाखाली दररोज दोन तीन तास वीज खंडित होत आहे तर शहरात अनेक भागात रात्रभर वीज नसणे या वीजेच्या लपंडावने नागरिक हैराण झाले आहेत.वीज बीलात मात्र कोणताच बदल नसून लाईट असली तेवढेच बील नसली तरी तेवढेच बील येत आहे

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
महावितरणच्या गलथान कारभाराने उद्योगधंद्यांचे कंबरडे घाईला! शिवगंगा खोऱ्यातील वेळू उपकेंद्राच्या रखडलेल्या कामावरून उद्योजक व नागरिकांचा महावितरणला घेराव..

महावितरणच्या गलथान कारभाराने उद्योगधंद्यांचे कंबरडे घाईला! शिवगंगा खोऱ्यातील वेळू उपकेंद्राच्या रखडलेल्या कामावरून उद्योजक व नागरिकांचा महावितरणला घेराव..

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group