पारा १२°अंशावर ; वातावरणातील बदलामुळे नागरिक सर्दी खोकला ताप आजाराने त्रस्त
भोर – तालुक्यात सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडली असून भाटघर धरण परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे.पारा १२° अंशावर आला असुन जोराच्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत, मोठी थंडी पडणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. या वर्षीही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असुन थंडीही त्याच प्रमाणात जोराची पडणार असल्याच चित्रं दिसत आहे. तापमान कमी जास्त होत असलं तरी थंडी मात्र कायम आहे. त्या दृष्टीने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. घेवडा, पावटा ,गहू, ज्वारी, भुईमूग, हरभरा, सोयाबीन अशा रब्बी हंगामातील पीकांना अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे ब-याच ठिकाणी रब्बी पिके समाधानकारक आहेत. वातावरणातील बदलामुळे, तापमानातील होणा-या चढउतारा बदलामुळे तालुक्यात सर्दी, खोकला, ताप अशा रूग्णांत वाढ झाली असुन दवाखान्यात गर्दी पहायला मिळत आहे.
पुढच्या काही दिवसात पारा अजुन खाली येऊन तापमानात अजुन घट होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे असे हवामान विभाकडुन सांगण्यात आले आहे . तालुक्यात जागोजागी सकाळी सायंकाळ , रात्री अपरात्री थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडुन शेकोट्या पेटवल्या जात आहेत.