भोरः अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यामातून भोर विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामुळे त्याचा फायदा येथील नागरिकांना होताना दिसत आहे. उत्रौली गावात या ट्रस्टच्या माध्यातून मोफत औषध उपचार शिबीर घेण्यात आले. या शिबिराला जेष्ठांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा स्वरुपा थोपटे यांच्या आयोजनातून मोफत साथींच्या आजारावर मोफत औषध उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच श्रावणमासनिमित्त उत्रौली गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा योगीराज मंगल कार्यालय, उत्रौली फाटा येथे करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या साथीच्या आजारांवर मोफत औषध उपचार शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला. सध्या पावसाचे दिवस असल्याने साथीचे आजार डोकं वर काढत असतात. त्यामुळे अनंत निर्मल चॅरिटेबल टॅस्टने ही गरज ओळखून नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी मोफत औषधे उपचार शिबीर घेण्यात आले.
या शिबीराचे आयोजन करण्यात आल्याने गावातील ग्रामस्थांनी भोरचे आमदार संग्राम थोपटे व अनंत निर्मल टॅस्टच्या अध्यक्षा स्वरुपा थोपटे यांचा सन्मान केला.