भोर – राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. अशाच एका उपक्रमात पुणे शहरातील लाल महाल येथे रविवारी (दि.१२) आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. यादरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांच्या मातोश्री शुभांगी शिवाजीराव शिवतरे यांना आदर्श माता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या मातोश्रीने रणजीत शिवतरे यांना आदर्शवत व सुसंस्कारित घडवण्याचे काम त्यांनी केले आहे. लाल महाल येथे रविवारी शुभांगी शिवतरे यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित केले यादरम्यान पुण्याचे आयुक्त राजेंद्र भोसले, दिपक मानकर, विकास पासलकर (भारतीय शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यादरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, राजेंद्र डूबल, प्रशांत धुमाळ, कैलास वडगुले उपस्थित होते तसेच मराठा सेवा संघ, अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती, अखिल शिवाजी नगर शिवजयंती उत्सव समिती, राजश्री शाहू महाराज सोशल फाउंडेशन व सर्व शिवप्रेमी नागरिक व संघटना यांच्या वतीने या आदर्श मातेस शुभेच्छा देण्यात आल्या.