Thursday, June 11, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

विधानसभेचे रणांगणः भोर विधानसभेसाठी आले ‘इतक्या’ उमेदवारांचे अर्ज; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली माहिती

by SBPRNL
October 30, 2024
विधानसभेचे रणांगणः भोर विधानसभेसाठी आले ‘इतक्या’ उमेदवारांचे अर्ज; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली माहिती

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोरः उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आणि वेळ संपुष्टात आल्याने काल दि. २९ अॅाक्टोबर रोजी २०३ भोर विधानसभा मतदार संघासाठी २३ उमेदवारांनी एकूण ३१ अर्ज दाखल केले. तर शेवटच्या दिवशी १८ उमेदवारांनी २४ अर्ज भरले असल्याची माहिती भोर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. विकास खरात आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र नजन यांनी दिली. तसेच आज दि. ३० अॅाक्टोबर रोजी आलेल्या सर्व अर्जांची छननी करण्यात येणार आहे. तर ४ नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे. या दिवसानंतरच खऱ्या अर्थाने चित्र अधिक स्पष्ट होईल.

अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे, महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर, तसेच किरण दगडे, बाळासाहेब चांदेरे, रणजित शिवतरे, कुलदीप कोंडे, शरद ढमाले, जीवन कोंडे, आणि संजय भेलके यांसारख्या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारांनी अधिकृत पक्षांचे अर्ज तसेच अपक्ष अर्जही भरले आहेत, त्यामुळे यंदाची निवडणुकीत प्रबळ स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

अर्ज दाखल केलेले उमेदवार आणि पक्षनिहाय अर्जांची संख्या खालीलप्रमाणे :

  • संग्राम अनंतराव थोपटे (इंडियन नॅशनल काँग्रेस) – ४ अर्ज
  • लक्ष्मण राम कुंभार (दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल) – १ अर्ज
  • जीवन पांडुरंग कोंडे (भारतीय जनता पार्टी) – १ अर्ज
  • बाळासाहेब रामदास चांदेरे (शिवसेना) – २ अर्ज
  • दगडे किरण दत्तात्रय (अपक्ष) – १ अर्ज
  • स्वरुपा संग्राम थोपटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – १ अर्ज
  • शरद बाजीराव ढमाले (भारतीय जनता पार्टी) – १ अर्ज
  • सचिन सदाशिव देशमुख (अपक्ष) – १ अर्ज
  • भाऊ पांडुरंग मरगळे (अपक्ष) – १ अर्ज
  • अनिल संभाजी जगताप (सैनिक समाज पार्टी) – १ अर्ज
  • राहुल चांगदेव पवार (अपक्ष) – १ अर्ज
  • संजय भाऊसाहेब भेलके (अपक्ष) – १ अर्ज
  • कुलदीप सुदाम कोंडे (अपक्ष) – २ अर्ज
  • समीर विठ्ठल पायगुडे (अपक्ष) – १ अर्ज
  • अभिषेक संतोष वैराट (वंचित बहुजन आघाडी) – १ अर्ज
  • रणजीत शिवाजीराव शिवतरे (नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी) – २ अर्ज
  • शंकर हिरामण मांडेकर (नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी) – २ अर्ज
  • भाऊ पांडुरंग मरगळे (नयन छत्रपती शासन) – १ अर्ज
  • दगडे पियुषा किरण (अपक्ष) – १ अर्ज
  • सुर्यकांत राजाराम माने (अपक्ष) – १ अर्ज
  • रामचंद्र भगवान जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष) – १ अर्ज
  • अनिल चंद्रकांत सपकाळ (अपनी प्रजाहित पार्टी) – १ अर्ज
  • प्रमोद पंडित बलकवडे (अपक्ष) – १ अर्ज
  • भरत दिनकर शेडगे (स्वराज्य शक्ती सेना पार्टी) – १ अर्ज

यावेळी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या मोठी असल्याने भोर मतदारसंघातील निवडणूक अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील प्रमुख स्पर्धेत काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच अन्य स्थानिक पक्ष व अपक्ष उमेदवारांचे आव्हान पाहायला मिळणार आहे.

Tags: Bhorrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
विधानसभेचे रणांगणः भोर विधानसभेसाठी आले ‘इतक्या’ उमेदवारांचे अर्ज; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली माहिती

भोर विधानसभेच्या रणांगणात आता कडवे आव्हान इच्छुकांची मनधरणी करण्याचे; आयत्या वेळी युतीच्या उमेदवारीची माळ शंकर मांडेकरांच्या गळ्यात

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group