भोरः उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आणि वेळ संपुष्टात आल्याने काल दि. २९ अॅाक्टोबर रोजी २०३ भोर विधानसभा मतदार संघासाठी २३ उमेदवारांनी एकूण ३१ अर्ज दाखल केले. तर शेवटच्या दिवशी १८ उमेदवारांनी २४ अर्ज भरले असल्याची माहिती भोर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. विकास खरात आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र नजन यांनी दिली. तसेच आज दि. ३० अॅाक्टोबर रोजी आलेल्या सर्व अर्जांची छननी करण्यात येणार आहे. तर ४ नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे. या दिवसानंतरच खऱ्या अर्थाने चित्र अधिक स्पष्ट होईल.
अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे, महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर, तसेच किरण दगडे, बाळासाहेब चांदेरे, रणजित शिवतरे, कुलदीप कोंडे, शरद ढमाले, जीवन कोंडे, आणि संजय भेलके यांसारख्या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारांनी अधिकृत पक्षांचे अर्ज तसेच अपक्ष अर्जही भरले आहेत, त्यामुळे यंदाची निवडणुकीत प्रबळ स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
अर्ज दाखल केलेले उमेदवार आणि पक्षनिहाय अर्जांची संख्या खालीलप्रमाणे :
- संग्राम अनंतराव थोपटे (इंडियन नॅशनल काँग्रेस) – ४ अर्ज
- लक्ष्मण राम कुंभार (दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल) – १ अर्ज
- जीवन पांडुरंग कोंडे (भारतीय जनता पार्टी) – १ अर्ज
- बाळासाहेब रामदास चांदेरे (शिवसेना) – २ अर्ज
- दगडे किरण दत्तात्रय (अपक्ष) – १ अर्ज
- स्वरुपा संग्राम थोपटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – १ अर्ज
- शरद बाजीराव ढमाले (भारतीय जनता पार्टी) – १ अर्ज
- सचिन सदाशिव देशमुख (अपक्ष) – १ अर्ज
- भाऊ पांडुरंग मरगळे (अपक्ष) – १ अर्ज
- अनिल संभाजी जगताप (सैनिक समाज पार्टी) – १ अर्ज
- राहुल चांगदेव पवार (अपक्ष) – १ अर्ज
- संजय भाऊसाहेब भेलके (अपक्ष) – १ अर्ज
- कुलदीप सुदाम कोंडे (अपक्ष) – २ अर्ज
- समीर विठ्ठल पायगुडे (अपक्ष) – १ अर्ज
- अभिषेक संतोष वैराट (वंचित बहुजन आघाडी) – १ अर्ज
- रणजीत शिवाजीराव शिवतरे (नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी) – २ अर्ज
- शंकर हिरामण मांडेकर (नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी) – २ अर्ज
- भाऊ पांडुरंग मरगळे (नयन छत्रपती शासन) – १ अर्ज
- दगडे पियुषा किरण (अपक्ष) – १ अर्ज
- सुर्यकांत राजाराम माने (अपक्ष) – १ अर्ज
- रामचंद्र भगवान जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष) – १ अर्ज
- अनिल चंद्रकांत सपकाळ (अपनी प्रजाहित पार्टी) – १ अर्ज
- प्रमोद पंडित बलकवडे (अपक्ष) – १ अर्ज
- भरत दिनकर शेडगे (स्वराज्य शक्ती सेना पार्टी) – १ अर्ज
यावेळी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या मोठी असल्याने भोर मतदारसंघातील निवडणूक अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील प्रमुख स्पर्धेत काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच अन्य स्थानिक पक्ष व अपक्ष उमेदवारांचे आव्हान पाहायला मिळणार आहे.