Sunday, June 7, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

बापरे! महाकाय मगरीने उडवली सगळ्यांचीच झोप; मगरीच्या दहशतीमुळे सुरक्षा रक्षकांची घाबरगुंडी

वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर मगरीला पकडण्यात यश, आधी वाटला साप.... पण निघाली, तब्बल साडे पाच फुट लांबीची मगर

by Team Rajgad Publication
August 7, 2024
बापरे! महाकाय मगरीने उडवली सगळ्यांचीच झोप; मगरीच्या दहशतीमुळे सुरक्षा रक्षकांची घाबरगुंडी

राजगडः वेल्हे(राजगड) व मुळशी तालुक्यातील वरसगाव धरणाच्या मुख्य भिंतीवर मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी पहाटे तीन वाजेपर्यंत महाकाय मगर ठाण मांडून बसली होती. मगरीला सुरक्षा रक्षकांनी हूसकावून लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु मगर ही त्यांच्या अंगावर हल्ला करण्यासाठी चवताळली, त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी तेथून पळ काढला. या मगरीची दहशत इतकी होती की, सुरक्षा अधिकाऱ्यांसह जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांची झोप उडाली. अखेर राजगड (वेल्हे) तालुका वनविभागाने पाचारण केल्यानंतर रेक्सु बावधन वन्यप्राणी पथकाच्या मदतीने पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास या मगरीला पकडण्यात वन विभागाला यश आले. त्यानंतर या मगरीला तिच्या मूळ अधिवास सोडून देण्यात आले. यानंतर भयभीत झालेल्या सुरक्षा रक्षकांसह अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

साप नाही, ही तर मगर!

You might also like

धक्कादायक…..! बाभळीच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला १७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह; राजगड तालुक्यातील घटनेने मोठी खळबळ

राजगड तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची स्थिती ‘दयनीय’; जनावरे जगवायची तरी कशीः शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो…; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वरसगाव धरणाच्या मुख्य भिंतीवर सुरक्षा रक्षक राहुल जाधव व कुणाल कुराडे हे पाहरा देत उभे होते. त्यावेळी भिंतीवरील मुख्य प्रवेशद्वाराच्या लोखंडी गेटजवळील भिंतीलगतच्या गवतात त्यांना मोठ्या सापासारखा प्राणी दिसला. जाधव याने बॅटरीच्या प्रकाशात जवळ जाऊन पाहिले असता, तेथे त्यांना मगर असल्याचे दिसले. याची माहिती त्यांनी अधिकऱ्यांना कळविली असता, वरसगाव धरणाचे शाखा अभियंता विरेश राऊत व पानशेतचे शाखा अभियंता अनुराग मारके यांनी धरणावर धाव घेतली. प्रवेशद्वार बंद केल्याने तेथून बाहेर पडण्यासाठी मगर दोन्ही बाजूला धाव घेत होती. त्यावेळी हातात बॅटरी घेऊन तिला हुसकावून लावणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या अंगावर मगर चवताळून धावून येत असल्याने सर्वंजण भयभीत झाले.

या घटनेची माहिती राजगड (वेल्हे) तालुका वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे यांनी मिळताच त्यांनी बावधन येथील वन्यप्राणी रेक्सु पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मगरीला पकडण्याची एक मोहीम आखण्यात आली. रेक्सु पथकाच्या १५ जवानांसह वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे, वनरक्षक मनोज महाजन, सुनिता अर्जुन, स्वप्निल उंबरकर आदी १० कर्मचारी तसेच वरसगाव धरणाचे सुरक्षा रक्षक या मगरीला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. मात्र, प्रवेशद्वाराच्या भिंतीवर पुन्हा-पुन्हा मगर चढत होती. परंतु, ही मगर चवताळून येत होती. हातात बॅटरी, काठ्या असूनही सर्वांना या मगरीला पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अखेर काही तासांच्या शर्तीच्या प्रयत्नांनंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मगरीला पकडण्यात वनविभागाला यश आले.

मगरीला पकडून तिला तिच्या मूळ अधिवास क्षेत्रात पहाटे सोडण्यात आले आहे. तिला पुन्हा वरसगाव धरणात सोडलेले नाही. त्यामुळे शेतकरी, नागरिकांनी घाबरू नये.

राजगड तालुका वन विभागागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे 

मगर धरणात सोडण्यावरून शासकीय यंत्रणेत वादंग

या मगरीपासून सुरक्षा रक्षक तसेच धरण खोऱ्यातील रहिवाशांच्या जीवीताला धोका आहे. त्यामुळे तिला पुन्हा वरसगाव धरणात सोडू नये, अशी विनंती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी करुनही वनविभागाने सुरुवातीला त्यांची विनंती मान्य केली नाही. त्यामुळे वनविभाग व जलसंपदा विभागात काही वेळ वाद झाला. अखेर वनविभागाने मगरीला वरसगावमध्ये सोडले जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर हा वाद संपुष्टात आला.

धरणातील पाणी सोडण्यासाठी तसेच पाहरा देण्यासाठी धरणाच्या मुख्य भिंतीसह परिसरात २४ तास अधिकारी, सुरक्षा रक्षक तैनात असतात. मुख्य भिंतीवर मगर ठाण मांडून बसल्याने तिला पुन्हा धरणात सोडल्यास तिच्यापासून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. मगरीला पकडल्यानंतर तिला धरणात सोडू नये यासाठी, जवळपास अर्धा पाऊण तास आम्ही वनविभागाला विनंती करत होतो.

अनुराग मारके, शाखा अभियंता, पानशेत धरण

गेल्या तीन वर्षांपासून धरणात मगरीचे वास्तव्य आहे. धरणातील पाणी कमी झाल्यानंतर उन्हाळ्यात तसेच पाणी वाढल्यानंतर पावसाळ्यात मगर धरणाच्या तिरावर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह पर्यटकांना धोका आहे. पहाटे मगर पकडण्यात आली असली तरी अजून धरणात अनेक मगरी असाव्यात.

देविदास हनमघर, सरपंच, साईव बुद्रुक (ता. राजगड)

Tags: damrajgadreskuewaterfall
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

धक्कादायक…..! बाभळीच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला १७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह; राजगड तालुक्यातील घटनेने मोठी खळबळ
क्राईम

धक्कादायक…..! बाभळीच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला १७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह; राजगड तालुक्यातील घटनेने मोठी खळबळ

December 5, 2024
ताज्या बातम्या

राजगड तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची स्थिती ‘दयनीय’; जनावरे जगवायची तरी कशीः शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

December 4, 2024
नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो…; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे
ताज्या बातम्या

नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो…; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे

November 30, 2024
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अवघ्या 18 वर्षाच्या पोराला जीवाला मुकावे लागले; राजगड तालुक्यातील घटनेने हळहळ
ताज्या बातम्या

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अवघ्या 18 वर्षाच्या पोराला जीवाला मुकावे लागले; राजगड तालुक्यातील घटनेने हळहळ

November 29, 2024
भोर, राजगडमध्ये महाविकास आघाडीलाच पसंती; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीची वाढणार डोकेदुखी
ताज्या बातम्या

भोर, राजगडमध्ये महाविकास आघाडीलाच पसंती; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीची वाढणार डोकेदुखी

November 27, 2024
भोरः लोकशाहीच्या उत्साहात १०७ वर्षांच्या आजोबांचा सहभाग; तीन पिढ्यांतील १६ जणांसोबत बजाविला मतदानाचा हक्क
ताज्या बातम्या

भोरः लोकशाहीच्या उत्साहात १०७ वर्षांच्या आजोबांचा सहभाग; तीन पिढ्यांतील १६ जणांसोबत बजाविला मतदानाचा हक्क

November 22, 2024
Next Post
बाप समजून घेताना….. विद्यार्थ्यींनीना अश्रू अनावर; वसंत हंकारेंची व्याख्यानमाला, मुले-मुली-पालकांचा उस्फुर्त सहभाग

बाप समजून घेताना..... विद्यार्थ्यींनीना अश्रू अनावर; वसंत हंकारेंची व्याख्यानमाला, मुले-मुली-पालकांचा उस्फुर्त सहभाग

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group