Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

धक्कादायक…..! बाभळीच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला १७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह; राजगड तालुक्यातील घटनेने मोठी खळबळ

by SBPRNL
December 5, 2024
धक्कादायक…..! बाभळीच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला १७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह; राजगड तालुक्यातील घटनेने मोठी खळबळ

राजगडः १७ वर्षीय मुलगा येथील एका नामांकित महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी घराच्यांना सांगून घराबाहेर पडला तो घरी परतला नाही. यामुळे काळजीत असल्याने घराच्या व्यक्तींनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जे काही घरांच्या समोर आले. त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमिनीच सरकली. येथे असलेल्या एका नामांकित महाविद्यालयात बाभळीच्या झाडाला मुलाचा साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेल्या सर्वांनाच मोठा धक्का बसला. शिवराज नारायण रेणुसे वय वर्ष १७ असे गळफास घेतलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेने त्याच्या घराच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. राजगड पोलिसांनी मयत असलेल्या मुलाच्या मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.

परीक्षा असल्याचे सांगून शिवराज पडला घराबाहेर अन्…

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

दिनांक ३ नोव्हेंबर रोजी दत्तात्रय विष्णू रेणुसे यांच्याकडे शिवराज नारायण रेणुसे (वय वर्ष १७) हा गावी राहण्याकरिता आला होता. त्याचे आईवडील हे पुण्यात राहिला आहेत. ४ नोव्हेंबरच्या सकाळी ९ वाजता शिवराज हा त्याच्या चुलत भावासोबत महाविद्यालयात नायगाव येथून निघून गेला. यानंतर बराच वेळ झाला तरी शिवराज हा त्याच्या पुण्यातल्या घरी परतला नाही. शिवराजच्या घराच्या व्यक्तींनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना समजले की शिवराज हा पेपरलाच गेला नव्हता. मग प्रश्न होता तो नेमका गेला तरी कुठे? यानंतर सर्वांनी शिवराजचा शोध नसरापूर येथे घेण्यास सुरुवात केली. शिवराजच्या शिक्षकांनी त्यांना सांगितले की तो पेपरला आलाच नाही. अखेर शिवराजच्या कॅालेजच्या सूरज पवार या मित्राने शिवराजचा चुलत भाऊ करण लक्ष्मण रेणुसे याला फोन करून तुम्ही चेलाडी येथे या, आल्यावर सगळं सांगतो आणि पुढे जे काही समोर आलं त्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची वाळू सरकली.

मित्राने सांगितली हकीकत 

त्यानंतर सर्वजण चेलाडी येथे सुरज पवार याचेकडे आले. त्याने सर्वांना राजगड पोलीस स्टेशन येथे नेले. त्याने पोलिसां समक्ष सांगीतले,  नायगावकडे जाणारे रोडच्या कडेला जिथे सर्व मुले अभ्यास करीत असतात. तेथे झाडाला कोणीतरी लटकत आहे. हे आम्ही पाहीले आहे, आम्ही घाबरलो असल्याने जवळ गेलो नाही. तरी तुम्ही सोबत येवून खात्री करा असे म्हटल्यावर सर्वजण घटनास्थळी गेले. एका बाभळीच्या झाडच्या फांदीला शिवराज नारायण रेणुसे (वय 17 वर्ष) रा मेरायण ता वेल्हा जि पुणे याने साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर सर्व नातेवाईकांनी व त्याचे मित्र व पोलीसांच्या मदतीने शिवराज याला बेशुध्द अवस्थेत गळफासातून खाली उतरवून नसरापुर येथील एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, डॅाक्टरांनी शिवराजला तपासून मयत घोषित केले. यामुळे सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शिवराज याच्या अशा अकाली जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी दत्तात्रय विष्णू रेणुसे वय 23 वर्ष व्यवसाय शेली रा मेरावणे ता वेल्हे ता वेल्हे जि पुणे यांनी राजगड पोलिसांत खबर दिली असून याचा पुढील तपास पोलीस हवालदार बरकाले हे करीत आहेत.

Tags: Punerajgadrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
भिगवणः मित्रच बनला वैरी…..! भांडणाचा राग अनावर झाल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घूण हत्या

खळबळजनक....! विवाहितेवर चाकूने हल्ला, घटनेत विवाहितेचा मृत्यू; आरोपी पोलीस स्टेशनमध्ये हजर, इंदापूर तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group