जेजुरीः विजयकुमार हरिश्चंद्रे
येथे आठवडे बाजारामध्ये तसेच जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये स्वीफ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक-२ व जिजामाता हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मतदान जनजागृती केली.
गुरुवार दिनांक 24 रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत ही जनजागृती विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. यावेळी जेजुरी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल जगदाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोन या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरुची भालेराव मॅडम, विजया शिंदे मॅडम, प्रणाली कदम मॅडम तसेच जिजामाता विद्यालयाचे प्रल्हाद गिरमे सर, मोडक सर उपस्थित होते.