मुंबईः महायुतीतील घटक पक्षांनी राज्यपालांकडे सत्तास्थानेचे पत्र दिल्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी एका गोष्टीचा खुलासा केला. तुम्ही मी दिल्लीला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेलो होता असे चॅनेलच्या माध्यमातून दाखवत होता. मूळात मी माझ्या वैयक्तिय कामानिमित्त दिल्लीला गेलो होता. असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिले.
माझी पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर खासदार पदावर निवड करण्यात आली. दिल्लीतील ११ जनपथ या ठिकाणी त्यांना बंगला अलॅाट झालेले आहे. नियमानुसार करण्यात येणाऱ्या गोष्टींसाठी आर्किटेक्चरला सोबत घेऊन गेलो होतो. दुसर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हाबाबत सर्वाेच्च न्यायलयात प्रकरण गेले आहे. मी कधीही दिल्लीतील वकीलांच्या टीमला भेटायला गेलो नव्हतो. त्यामुळे त्यांची भेट घेणे गरजेची होती. तसेच तिसरे म्हणजे एका जवळच्या व्यक्ती असणाऱ्यांच्या लग्नसमारंभात गेला होता. असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी यावेळी दिले.
तिथे गेलो की आराम मिळतो
तसेच आम्ही तिघेजण शहा साहेबांना दिल्लीत एकत्रित भेटलो, त्यावेळी चर्चा झाली होती. यामुळे पुन्हा एकदा भेट घेण्याचा प्रश्नच येत नाही. तिथे गेलो की आराम मिळतो असा मिश्किल विधान देखील दादांनी यावेळी बोलतान केले.