मुंबईः मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस हे घेणार असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा माध्यमातून केल्या जात होत्या. तसेच शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्विकारला तयार नसून शिवसेनेतील आमदारांपैकी एकाला उपमुख्यमंत्री पद मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा झाल्या होत आहेत. सत्ता स्थापनेचे पत्र महायुतीतील प्रमुख नेत्यांनी राज्यपालांना दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री पदाबाबत शिंदेंनी स्पष्टता केली नसल्याचे पाहिला मिळाले. तसेच संध्याकाळ पर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होतील असे शिंदे यावेळी म्हणाले. पत्रकारांनी केलेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या विधानाबाबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात तुफान फटकेबाजी पाहिला मिळाली. यामुळे काही वेळ हास्याचा कोळ उडल्याचे पाहिला मिळाले.
शिंंदे यांना उपमुख्यमंत्री पदाचा प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले उनका शाम तक आयेगा मैं तो रहनेवाला हूँ, यावर शिंदे म्हणाले उनको अनुभव है शाम और सुबहका असे मिश्किल विधान त्यांनी दादांना केले. यावर पुन्हा अजित पवार म्हणाले दोघांनी केले होते ते राहून गेलं होते आता पुढच्या पाच वर्षांत ते पूर्ण होईल असे उत्तर दिले. यामुळे यावेळी चालू पत्रकार परिषदेत एकच हास्यकल्लोळ झाला. माझ्या नावाची शिफारस देवेंद्रजींनी येथेच केली होती. आज त्यांना मुख्यमंत्री पद मिळावे याची शिफारस शिवसेनेच्या वतीने राज्यपालांकडे पत्राद्वारे करण्यात आल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.