शेताचे काम सकाळी ऊरकल्याने दिवसभर दुसऱ्या कामाला मोकळीक
ढगाळ हवामानंतर पुन्हा हळूहळू वातावरणात थंडीने जोर धरला असुन शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात ढगाळ हवामानामुळे पिकांवर पडणाऱ्या रोगाचा प्रादुर्भावाचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या गहू, हरभरा, ज्वारी, घेवडा यांच्या पेरण्या उरकल्या असुन या पेरलेल्या रब्बी पिकांची उगवण ही चांगली झाली.पहाटे सकाळी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी अनुकूल वातावरण असते व त्याचा फायदा शेतासाठी चांगला होत असल्याने भोर तालुक्यात सर्वत्रच पहाटेच्या शेती भिजवणीला शेतकरी अधिक पसंती देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
मार्गशीर्ष महिन्यात दुपारी कडक ऊन असते आणि दिवस छोटा असल्याने अंधार लवकर पडतो शेतीच्या कामासाठी पुरेसा वेळ मिळत नाही असे शेतकरी सांगत आहे.पहाटे रात्रभर पडणाऱ्या धुक्यामुळे जमीन ओलसर असते त्यामुळे कमी वेळेत शेतीची भिजवण लवकर व चांगली होत आहे व दिवसभर पुढील कामासाठी मुबलक वेळ मिळत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. सध्या उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणीस सुरूवात झाली आहे. भाटघर धरणात सध्या ९९ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून धरणात भरपूर पाणीसाठा शिल्लक असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे.
” मी बांधकाम व्यवसायाचे काम करतो शेतीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही परंतु पहाटेच्या वेळी शेतीला योग्य आणि चांगले वातावरण असल्याने शेतीची भिजवणी पहाटे प करत आहे त्यामुळे पुढील कामासाठी मला भरपूर वेळ मिळत आहे.सध्या शेतामध्ये ज्वारी,हरभरा ,गहू, घेवडा ही पिके असुन या थंडीच्या हवामानात पिके समाधानकारक आहेत. ” रामचंद्र गो.झांजले – शेतकरी रा.बसरापुर (ता.भोर)