शिरवळ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्तसो, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वे संचालकसो, विजय चिंचाळकर विभागीय उपायुक्तसो, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अवैध दारु विक्री व वाहतूकीवर गस्त घालत असतानाच वैभव वैद्य प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा विभागाने पारगांव ता. खंडाळा जि. सातारा गावचे हद्दीत पुणे कडून साताराच्या दिशेने येणारी बेकायदेशीर विदेशी दारु व बिअरची वाहतूक पकडून संकेत ज्ञानेश्वर यादव रा. सटलवाडी ता. पुरंदर जि.पुणे व गणेश विलास गुजर रा.शिर्के कॉलनी मोह तर्फे शिरवळ ता. खंडळा जि.सातारा या दोन इसमांविरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर दोन्ही इसमांच्या ताब्यातून विदेशी दारु व बिअरचे विविध ब्रँडचे एकूण २२ बॉक्स किंमत १,५२,२४०/- तसेच मारुती कंपनीची चारचाकी इको जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्हयात वाहनासह एकूण ८,५२,२४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास विजय मरोड दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा हे करीत आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सातारा जिल्हयामध्ये बेकायदा हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारुची बेकायदेशीर निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती या कार्यालयाच्या १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर देण्यात यावी असे आवाहन श्री. वैभव वैद्य प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांनी केले आहे.