कोल्हापूरः कोल्हापूर उत्तर मतदार संघातून छत्रपती घराण्यातील मधुरिमाराजे छत्रपती यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अचानक त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली. यामुळे काँग्रेसचे सतेज पाटील यांनी घटलेल्या घटनेतबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. अचानकपणे याबाबची माहिती न देता मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्याने सतेज पाटील आणि काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला होता. सतेज पाटील यांनी शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. या प्रकरणावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्या विषयावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे.
याविषयी बोलताना सतेज पाटील म्हणाले, त्या विषयावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जे घडल आहे त्यावर आता बोलण्याची आवश्यता आहे अस मला वाटत नाही. पुढे कसे जाते येईल यासाठीची चर्चा महाविकास आघाडीसोबत करणार आहे. इंडिया आघाडीची बैठक झालेली आहे. पुढची दिशा आम्ही ठरवू तसेच आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर कोल्हापूर उत्तरमधील जागेसंदर्भातील आमची भूमिका आज रात्रीपर्यंत स्पष्ट होणार असल्याचे भूमिका त्यांनी मांडली. तसेच छत्रपती शाहू महाराजांसोबत देखील चर्चा झालेली आहे त्यांना विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेऊ असे देखील ते यावेळी म्हणाले.