खेड शिवापुर: भोर विधानसभा निवडणुकीत यंदा तगडी फाईट पाहिला मिळणार यात काही शंका नाही. निवडणुकीच्या आखाड्यात चार चेहऱ्यांच्या नावांची चर्चा प्रामुख्याने होताना दिसत आहे. असे असले तरी अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पाहिला मिळत आहे, ते राबवित असलेली प्रचार यंत्रणा जोरदारपणे त्यांचा प्रचार करताना दिसत आहे. यामुळे आघाडी आणि युतीमधील उमेदवारांसमोर ते तगडे आव्हान उभे करू शकतात, असे बोलले जात आहे.
कोंडे यांच्या पाठीशी गेल्या दोन पंचवार्षिक विधानसभेच्या निवडणुकीचा दांडगा अनुभव आहे. भोर विधानसभेत त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. शिवसेनेमध्ये असताना कोंडे यांनी अनेकांना स्वःताशी जोडलेले आहे. कार्यकर्ते व समर्थकांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत आहे. सर्वजण मिळून नियोजन पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवित आहेत. यामध्ये यंदा कुलदीप कोंडे यांनांच आमदार करायचा असा दृढ निश्चय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. कोंडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी भोरमध्ये एक सभा घेत मोठे शक्तीप्रदर्शन करीत मैं भी किस से कम नही, असे दाखवून दिले आहे. या सभेच्या माध्यमातून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्यानंतर तालुक्यातील विविध गावांना ते भेटी देत असल्याने त्यांना मतदारांची पसंती मिळत असल्याचे सांगितले जात आहे.