भोर: महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शंकर मांडेकर हे भोर विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. त्यांना हरिश्चंद्री गावच्या गावकऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मांडेकर यांनी गावाला भेट देत इथल्या समस्यांची माहिती घेतली. तसेच विकासासाठी सतत कटिबद्ध असणार असल्याची ग्वाही गावकऱ्यांना दिली. भोरमध्ये रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. यामुळे एमआयडीसी सुरू करून औद्योगिकीकरणाला चालना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भोर व राजगड तालुक्यातून कोकणात जाणाऱ्या रस्त्यांना विकसित करणार असल्याचा मानस असल्याचा मांडेकर यांनी सांगितले.
यावेळी जिल्हापरिषद सदस्य चंद्रकांत बाटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, ग्रामपंचायत सदस्य शुभम गाडे, उत्तम जगन्नाथ गाडे, संपत दत्तू गाडे, संपत पाचकाळे, अशोक बापू पाचकाळे, प्रकाश आनंदा पाचकाळे, श्रीनाथ गाढवे, जयदीप खुटवड, पांडुरंग गाडे, राजाराम गाडे, राम पाचकाळे, राम गाडे, देवराम गाडे, संदेश मस्के, बाळासाहेब गाडे, धनाजी बाबुराव गाडे, शांताबाई गाडे, मनीषा पाचकाळे, अरुणा गाडे, प्रवीण गाडे, दत्तात्रय पाचकाळे, शशिकांत गाडे, भरत गाडे, काळुराम भाटे, सुरज गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.