भोर: विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांना बावधन गावाने तसेच भोर विधानसभेतील अनेक गावांनी एकमुखाने जाहीर पाठिंबा दिला आहे. बावधन गावातील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली, ज्यामध्ये स्थानिक पातळीवर किरण दगडे पाटील यांनाच मतदान करण्याचा निर्णय घेतला गेला. गावातील ग्रामस्थांनी दगडे पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास कामांची प्रशंसा केली असून, त्यांनी गावासाठी क्रीडा संकुल, रस्ते, फुटपाथ, आणि महत्वाचा पाणीपुरवठा यासारखी मूलभूत कामे केली असल्याचे नमूद केले.
किरण दगडे पाटील यांनी भोर, वेल्हा, मुळशी या भागांमध्ये पुढील काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्याची योजना आखली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीतील काही ऐतिहासिक स्थळांची सुधारणा करण्यावर त्यांचा भर आहे. भोरमधील एमआयडीसी आणि ऐतिहासिक राजगड व तोरणा गड या स्थळांचे जतन आणि विकास करण्याचा दगडे पाटील यांचा संकल्प आहे. त्यांच्या मते, हे कार्य पूर्ण झाल्यास या परिसरात पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, तसेच स्वराज्याचे एतिहासिक वारसा स्थळ नव्या पिढीसाठी उजेडात आणले जाईल.
भव्य प्रचार शुभारंभ सभेचे आयोजन
आज भोर येथे अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ सभेचे आयोजन केले असून ते छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेल्या रायरेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन प्रचाराचा प्रारंभ करतील तसेच भोर येथे सभेचे आयोजन करत विधानसभेतील नागरिकांच्या उपयुक्त घोषणा केल्या जाणार असून किरण दगडे पाटील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.