भोर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या मतदार संघातील जाहीरनामा प्रसिद्ध केला. भोर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेत भोर विधानसभेसाठी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या मेळाव्यात तालुक्याला बदल हवा आहे, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तसेच हा बदल घडवण्यासाठी वैयक्तिक मतभेद बाजूला सारून शंकर मांडेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्याने माझी उमेदवारी स्वीकारली याचा मला आनंद असून, मी एक हाडाचा कार्यकर्ता आहे. काम करताना कधी पक्षपातीपणा केला नाही. विद्यमान आमदार हे प्रचार करताना भोर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात वेगळी भूमिका मांडत आहेत. पण त्यांनी आजवर केलेल्या दुर्लक्षामुळेच आपल्या भागाचा विकास झाला नसल्याची टीका मांडेकर यांनी थोपटे यांच्यावर केली. रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत सुविधा देखील नागरिकांना मिळत नसल्याची खंत यावेळी मांडेकर यांनी व्यक्त केली.
यावेळी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे मा. अध्यक्ष बाबुराव चांदेरे, जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मा. जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, मा. सभापती बाबा कंधारे, कालिदास गोपाळघरे, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माऊली साठे, पै. पंकज हरपुडे, मा. जिल्हापरिषद सदस्य चंद्रकांत बाठे, जिल्हा नियोजन समितीचे विक्रम दादा खुटवड, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भालचंद्र भाऊ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, मा. गटनेते भोर नगरपालिका यशवंत डाळ, राष्ट्रवादी काँग्रेस भोर शहर अध्यक्ष केदार देशपांडे, महिला अध्यक्ष विद्या पांगारे, युवती अध्यक्ष नीलम झांजोळ, मा. परिषद सदस्य भिकू अण्णा निगडे, अशोक आप्पा शिवतरे, शेतकरी सेलचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, विद्यार्थ्याध्यक्ष प्रशांत पडवळ, कार्याध्यक्ष भोर विधानसभा भूषण शिवतरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस गायकवाड सर, ओबीसी सेल अध्यक्ष मारुती गोरे, मनोज खोपडे, प्रणव घोडके, मोहन इंदलकर, विष्णू मादगुडे, अतुल काकडे, ऋषी गायकवाड, गणेश निगडे आदी पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘हे’ आहेत जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे
- पुढील ५ वर्षात भोर-राजगड-मुळशीला प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहोचवणार
- भोरमध्ये एमआयडीसी उभी करून रोजगार निर्मितीसाठी औद्योगिकीकरणाला चालना देण्याचा आणि भोर व राजगड तालुक्यातून कोकणात जाणाऱ्या रस्त्यांना विकसित करणार
- मतदारसंघातील रस्त्यांचा विकास करत बसस्थानकांची नव्याने उभारणी करण्याचा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा विकास करून दळणवळण व्यवस्था भक्कम करणार
- मतदारसंघातील ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करण्याचा आणि शासकीय शाळांची गुणवत्ता सुधारून युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करणार
- मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालय अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज बनवून उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा, पुरेसा औषधसाठा आणि गरजू रुग्णांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देणार
- आपल्या मतदारसंघात असणारी ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी’ स्थापन केलेली स्वराज्याची राजधानी ‘राजगड’ आणि अन्य तीर्थक्षेत्रांचा, निसर्गरम्य पर्यटनस्थळांचा विकास करून रोजगार निर्मितीला चालना देणार
- मतदारसंघातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी मतदारसंघातील हिंजवडी, माण, सूस, भूगाव, बावधन या भागातील रस्त्यांचे मजबूतीकरण व पुनर्विकास करणार
- मतदारसंघातील हिंजवडी-माण येथील आयटी पार्कमध्ये स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार