पिंपरीः शहरात स्वयंपाक बनवण्याच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आले आहे. सदर घटना दि. २ नोव्हेंबर रोजी घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाल्याचे पाहिला मिळाले आहे. या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे नाव दिपू कुमार वय १९ असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याचा मित्र मुकेश हिरा कुशवाह याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्याच्या मित्राने त्याला जीवे मारण्याचा निर्णय का घेतला, त्या रात्री नेमकं काय घडले होते. याबाबत काही माहिती मिळाली आहे.
येथील काळभोरनगरमधील एका कंपनीत मुकेश आणि दिपू हे काम करायचे. २ नोव्हेंबरच्या दिवशी त्यांच्यात स्वयंपाक करण्याच्या कारणावरून वाद झाला वादाचे रुपांतर भांडणात झाले. या भांडणाचा राग मुकेश यांने मनात ठेवला होता. दिपू हा सर्व कामगारांसोबत झोपलेले असताना बदला घेण्यासाठी मुकेश तिथे आला. त्याने दीपू झोपेत असताना लोंखडी रॅाडने त्याच्या डोक्यात क्रूरपणे मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्याच्या शेजारी झोपलेल्या कामगाराला हा प्रकार कळताच त्याने मुकेशला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. या घटेनेत दिपूचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपी मुकेशला अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत.