विधानसभा निवडणुक यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच होणार ,वेळवंड खोऱ्यातील बसरापुर,बारे खुर्द,बारे बुद्रुक,म्हाळवडी गावात विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात रणजित शिवतरे यांचे वक्तव्य
भोरला पन्नास वर्षे सत्ता असुनही तालुका मागास आहे, महायुतीच्या सरकार मार्फत अनेक योजना आता जनतेसाठी राबविण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना,पीम किसान, शेतकरी सन्मान योजना,वयोश्री योजना, महिलांना अल्पदरात एसटी बस सेवा अशा असंख्य योजना थेट जनतेपर्यंत महायुती सरकारच्या मार्फत आल्या आहेत.गेली पन्नास वर्ष एक हाती सत्ता भोगणाऱ्यांना खाली खेचा,लोकांनी एक मताने ठरविले तर नक्कीच यावेळी बदल घडु शकतो, परिवर्तनाशिवाय आता पर्याय नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जि.प.उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी रविवार (दि१३.) बसरापुर येथील विकास कामे भुमीपुजन उद्घाटन कार्यक्रमात केले.
यावेळी भोर तालुक्यातील महायुतीचे भाजपाचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,सरचिटणीस प्रा.गायकवाड, निलेश कोंडे, भोलावडेचे सरपंच प्रवीण जगदाळे, किवतचे सरपंच तानाजी चंदनशिव, सर्जेराव बोडके, धनंजय आवाळे, प्रशांत पडवळ, बसरापूर विद्यमान सरपंच निलम झांजले , राजश्री साळुंके, शोभा झांजले, सविता झांजले, अनिता झांजले, उपसरपंच रामदास झांजले, माजी सरपंच सुरेश बदक, रमेश झांजले, अनिल झांजले, रामचंद्र झांजले, विष्णू पवार, शिवाजी साळुंके, सुर्यकांत झांजले ,केशव साळुंके व मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला उपस्थित होते. जिल्हा नियोजन, पुनर्वसन विभाग, जिल्हा परिषद अशा विविध माध्यमांतून मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम वेळवंड खोऱ्यातील बसरापुर,बारे खुर्द,बारे बुद्रुक,म्हाळवडी या गावात पार पडला.
शिवतरे पुढे म्हणाले की, बदल झाल्याचे उदाहरण भोलावडे गाव असुन एक हाती सत्ता असलेल्या भोलावडेत परिवर्तन घडून विविध विकास कामे झाली आहेत.जीवन कोंडे यांनी सांगितले.१९९९ साली सत्ताधाऱ्यांना पाणी पाजले आहे, तसेच आता ती वेळ जवळ आली आहे महायुतीच्या सर्व पदाधिका-यांनी मिळून दिलेल्या उमेदवारास यावेळी आपणाला विजयी करायचे आहे.तेव्हा सर्वांनी महायुतीच्या उमेदवार सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी संतोष घोरपडे, प्रा.गायकवाड, प्रवीण जगदाळे, धनंजय आवाळे, सुरेश बदक, रमेश झांजले यांनी मनोगते व्यक्त केलीत.