१७ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत मारली बाजी
भोरच्या जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी राजश्री निलेश पवार हिने आपल्या तल्लख बौद्धिक क्षमतेच्या जोरावर ग्लॅडिअस इंग्लिश मिडीयम स्कूल, एकतानगर चाकण (ता.खेड ) येथे १७ वर्षाखालील झालेल्या तालुकास्तरीय बुद्धीबळ या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत (दि.६) घवघवीत यश संपादन करून जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी आपली निवड सार्थ ठरवत आपल्या विद्यालयाचे नाव उज्वल केले. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील विद्यालयांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
भोर शहरातील माजी नगरसेवक , माजी उपनगराध्यक्ष गणेश पवार यांची पुतणी व प्रसिद्ध व्यापारी निलेश ज्ञानोबा पवार यांची मुलगी राजश्री पवार हिने यापूर्वीही शालेय क्रीडा प्रकारात अनेक स्पर्धेत यश मिळविले आहे. बुद्धिबळ या तल्लख बौद्धिक क्षमतेवर व एकाग्र बुद्धीमत्ता यांच्या जोरावर खेळल्या जाणाऱ्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत यश संपादन केल्याने तालुक्यातून राजश्री वर भरभरून कौतुक होत असुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिवा स्वरूपा थोपटे यांनीही राजश्री पवार हिने यश संपादन केल्याने तिचा सत्कार करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी वंदे मातरम् पतसंस्थेच्या चेअरमन गौरी पवार, कॉंग्रेसचे संतोष केळकर, निलेश पवार,विमल पवार, माजी जि.प.सदस्य गितांजली आंबवले उपस्थित होत्या.