महुडेकडुन भोरला येणाऱ्या एसटी बसला मोठा अपघात
भोर तालुक्यातील महुडे येथुन भोरकडे प्रवासी घेऊन येणा-या एम- एच- ०६ -एस ८२८९ या एसटी बसला महुडे येथील भानुसदरा येथे एसटी बस रस्त्याच्या कडेला घसरली असल्याने मोठा अपघात झाला असुन एसटी बस मधील चाळीसहुन अधिक प्रवासी जखमी झाली आहेत सर्व प्रवाशांना भोर येथील उपजिल्हा रुग्णालय रामबाग येथे आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवार (दि.३०) नेहमीप्रमाणे महुडे येथील प्रवाशांना भोर कडे घेऊन येत असताना रस्त्याच्या बाजूला विळदार वळणावर एसटी जाऊन भानुसदराजवळ रस्त्याच्या कडेला घसरली . यामध्ये ४० हून अधिक प्रवासी यामध्ये जखमी झाले आहेत .जखमी प्रवाशांना त्वरित भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत असे सांगण्यात आले आहे