मुंबईः एक महिला खोटं बोलून मंत्रालयात शिरली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis office) यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड केली होती. तसेच या महिलेकडून घोषणाबाजी देखील करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काल संध्याकाळी हा संपूर्ण प्रकार घडला असल्याची प्राथमिक आहे. मंत्रायलयात पर्स विसरली आहे असा बनाव करुन या महिलेने पास न घेता मंत्रालयात प्रवेश मिळविला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करुन फडणवीसांच्या नावाची नेमप्लेट देखील तोडली. गेल्या १८ तासांपासून पोलिसांकडून या महिलेचा शोध सुरू होता. अखेर या महिलेची ओळख पटली असून, तिचे नाव सार्वजिकरित्या जाहीर न करण्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या महिलेने मंत्रालयात कशाप्रकारे प्रवेश मिळविला. त्यावेळी बंदोबंस्तामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात येणार असून, संबधित महिलेवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या महिलेने हे कृत्य का केलं, यामागचा तिचा हितू काय होता, याची चौकशी पोलीस करणार आहेत. या घटनेमुळे मंत्रालयच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.