भोर : सध्या सर्वत्र विधानसभेचे वारे वाहू लागल्याने भोर तालुक्यातही हळूहळू नेतेमंडळींनीही आपण केलेल्या विकास कामांचा धडाका लोकांपर्यंत पोहोचवण्यात सुरूवात केली आहे. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, मल्टिमीडिया मार्फत या कामांची प्रसिद्धी करण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही सुद्धा आपापल्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्फत कामे मार्गी लावले असल्याचे सांगत आहेत यातूनच श्रेयवादाच्या लढाईला भोर तालुक्यात जोर चढला असून यात मात्र सामान्य जनता भरकटत जाऊन गावा-गावातुन,गावकी भावकीत आपापसात, फोनवर व्हॉट्सॲप गृपवर, मतभेदाचे राजकारण सुरू होऊन भांडण तंटे करण्यासाठी सज्ज झाली आहे.
नुकतीच भाटघर व वीर धरण प्रकल्पग्रस्त नागरी सुविधा विकासकामांची प्रशासकीय मंजुरी कामे परिपत्रके शासनाकडून मंजूर झाली. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी जि प उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी पत्रकार परिषदेत घेत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत ही कामे मंजूर केली आहेत असा दावा केला तर दुस-याच दिवशी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे यांच्यामार्फत पत्रकार परिषद घेत ही विकास कामे वीर व भाटघर धरणग्रस्त समिती मार्फत खूप पुर्वी पासुनची होती व ती आमदारांच्या व धरणग्रस्त समितीच्या पाठपुराव्याने मंजूर झाली आहेत.उगाच कोणी फूकटचे श्रेय घेऊ नये असे त्यांनी सांगितले.
यावरून मात्र भोर तालुक्यातील वेळवंड पसुरे, महुडे खोरे, भुतोंडे ,वीस चाळीस खोरे, हिरडस मावळ खोरे ,, हायवे पट्ट्यातील गावे अशा अनेक परिसरातील गावातून असणाऱ्या व्हाट्सअप ग्रुप वर मात्र नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांच्या मध्ये आपल्या पुढा-याची श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून गावातुन राजकारण भांडणं तंटे होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये अलिकडील विशीतील तरूण तडकाफडकी आरे ला कारे म्हणत हाणामारीला येत आहे. विकास कामे तर ही होतच राहतात नेते मंडळींची लोकप्रतिनिधींची ती जबाबदारी असते त्यासाठी ते निवडून आलेले असतात परंतु आपापसात भांडून आपापसात तंटे करून आजचा तरुण आपलेच व आपल्या गाव.
यावरून मात्र भोर तालुक्यातील वेळवंड पसुरे, महुडे खोरे, भुतोंडे ,वीस चाळीस खोरे, हिरडस मावळ खोरे ,, हायवे पट्ट्यातील गावे अशा अनेक परिसरातील गावातून असणाऱ्या व्हाट्सअप ग्रुप वर मात्र नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांच्या मध्ये आपल्या पुढा-याची श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून गावातुन राजकारण भांडणं तंटे होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये अलिकडील विशीतील तरूण तडकाफडकी आरे ला कारे म्हणत हाणामारीला येत आहे. विकास कामे तर ही होतच राहतात नेते मंडळींची लोकप्रतिनिधींची ती जबाबदारी असते त्यासाठी ते निवडून आलेले असतात परंतु आपापसात भांडून आपापसात तंटे करून आजचा तरुण आपलेच व आपल्या गावाचे नूकसान करीत आहेत असे जुने बुजुर्ग सांगत आहेत. एकंदरीत असे होणार की, आगामी निवडणूक होणार क्षणभराची, मात्र भांडण तंटे राहणार आयुष्यभराची अशी परिस्थिती सर्वत्र झाली आहे.