भोरच्या हिंदू समाजाच्या वतीने निषेध आंदोलन
भोरला सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्याविषयी खालच्या पातळीला जाऊन बेताल वक्तव्य करणार्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९९ आणि ३०२ या अंतर्गत गुन्हा नोंद करून , कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी भोरच्या सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात सोमवारी (दि२३) करण्यात आले.
सभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशन दरम्यान ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करून हिंदु देवता आणि संतांचे विडंबन करून समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या याचा निषेध करण्यासाठी सोमवारी २३ सप्टेंबर २०२४ रोजी शिवतीर्थ, भोर, जिल्हा पुणे येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेध आंदोलन घेण्यात आले यावेळी समस्त हिंदुंच्या वतीने एकमुखाने वरील मागणी करण्यात आली.
यावेळी हिंदुत्ववादी सुनील खळदकर, राहुल शिंदे, अक्षय पवार, भोर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि अन्नछत्रचे हेरंब रायरीकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व करत ज्ञानेश महाराव यांचा जाहीर निषेध व्यक्त केला, यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले. आंदोलनाला भोरमधील यखकल हिंदू मराठा समाजाचे सोमनाथ ढवळे, सचिन देशमुख, अतुल काकडे, विश्वजित चव्हाण, अक्षय पवार, सर्वेश शिवतरे, करण शेटे, अमोल शहा, राहुल गुजर, नितिन भागवत, अवधुत रायरीकर, मंगेश अंबुले, रोहित देशमाने, आकाश बांदल, ऋषिकेश बांदल, आशुतोष बांदल, गोविंद पोळ, प्रमोद भिलारे, शुभम तळेकर, श्रावण सुतार, अथर्व सुतार, विकास बांदल, अमोल मळेकर, प्रथमेश बोडके, मनोज घाटे, आदित्य शिवतरे , प्रशांत शेटे तसेच असंख्य स्वामीभक्त, शिवभक्त आणि श्रीरामभक्त, श्री स्वामी समर्थ परिवारातील भक्त तसेच शिवप्रेमी आणि समस्त हिंदु बांधव उपस्थित होते.