भोर: भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर व त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांवर प्रभावित होऊन भोर तालुक्यातील नाटंबी येथील पद्मावती देवी ट्रस्टचे चेअरमन विठ्ठल श्रीपती घाटे व विकास सेवा सोसायटीचे संचालक ज्ञानोबा यदू खोपडे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
थोपटे यांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन करून पक्षात स्वागत केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव कोंढाळकर, खरेदी विक्री संघाचे मा. चेअरमन शिवाजीराव नाटंबे, विकास सेवा सोसायटी चेअरमन संदीप शिवाजी जेधे यांच्यासह दशरथ खोपडे, शिवाजी घाटे, सुभाष खोपडे, संतोष खोपडे, मा. सरपंच यशवंत खोपडे, मा. सरपंच सुनील खोपडे, तसेच बाळासो श्रीपती खोपडे, बाळासो नारायण खोपडे, अंकुश खोपडे, सुखदेव नाटंबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.